पान:भवमंथन.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

((१०२) द्रव्योभ. * राष्ट्र ह्मणजे व्यक्तिसमुदाय. अर्थातच राष्ट्राचे गुण तेच व्यक्तींत असतात. एक राष्ट्र दुस-या राष्ट्रावर टपलेले असते आणि माणूस दुस-या माणसावर टपलेले असते. दुसरा गाफील राहील केव्हा आणि मी त्यास लुटीन केव्हा हा प्रयः स्न व्यक्ति करीत असतात. धनदौलत, अधिकार आणि भुमि ह्यांजवर सत्ता मिळविण्याकरिता रात्रंदिवस माणसे झटत आहेत. ऋणजे सत्तारूप मोहिनीच्या मानें नाचत आहेत. द्रव्य पाहिलें कीं मन द्रवत नाहीं असा मनुष्य फार क्वचित! द्रव्यांच्यापुढे कोणाचे महात्म्य नाही. द्रव्याकरितां पोटचे पार किंवा जन्मदाता बाप ह्यांचाही घात करण्यास मनुष्य तयार होते. राज्येची राज्ये फितुराने बुडाली आहेत, अप्तांस द्रव्याची लालूच दाखवून पोलीस लोक बंडाळी करणारास कसे पकडतात हे सर्वश्रुतच आह• १ - - 15 15 15 आया, । मोठा लोभ जनाला कलिरायाच्या युगांत कनकाचा ॥ तैसा दार सुताचा व बंधूचा जननीचा व जनकाचा ॥ १ ॥ -असो. ह्या बाबतीत जितकें लिहावे, जितक्या खटपटी व लटपटी उघडकीस माणाव्या तितक्या थोडयाच. त्यांच्या विवेचनांचे एक पुस्तकच होईल. ऋणून ती दिशा सोडून वैभवाचे परिणाम कसकसे होतात ह्याचा विचार करू. -ॐरि छा संपत्तीचा परिणाम विपत्ति ?

  • मनुष्याच्या शरीररचनेवरून, त्याच्या स्वभावावरून, त्याच्या वागणुकीच्या परिणामावरुन असे अनुमान होते की, त्यास जें जो संपन्नता प्राप्त होते, तों तो तो आळशी, शिथिल, बेफिकीर, व नामर्द होऊन आपले अकल्याण करून घेतो. जसजशी अडचण, विपत्ति आणि दगदग त्यास पडेल, तसतसा तौ युक्तिवान, उद्योग आणि सशक्त होऊन पाहिजे ते काम करवयास पटाईत होतो. ह्यामुळे एके सि इतिच ठरल्यासारखा आहे की, संपन्न व सुखी देशांतील वस्ती हलगर्जी, निरुद्योगी आणि अडाणी असावयाचीच. या योगार्ने तिला दारिद्रय व परतंत्रता यावयाचीच. नापीक आणि इवापाण्याचा त्रास असलेल्या देशांतील उद्योगी, कंटक २ बळकट लोक वर लिहिलेल्या सुपीक देशांत जाऊन तेथील अनुकूल स्थितीचा फायदा घेऊन तेथे सुसंपन्न होऊन तेथील गैदी मूळरहिवाशांवर अंमल करावयाचेच, आपल्या भरतभूमी