पान:भरतपुरचा वेढा.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याने रागाने बरेच जाट मारिले. पुनः इ० स० १५२५ त, दिल्लीच्या मोगल घराण्याचा प्रतापी मूळपुरुष बाबर हा पंजाबांत आला, त्या वेळी, त्याच्याशीही दोन हात करण्यास जाटांनी कमी केलें नाहीं, व तेव्हां हे लोक इतके बलिष्ठ झाले होते की, त्यांचा पराभव करितांना बाबराचें अफगाण सैन्य अगदी हतवीर्य होऊन गेले. वरील कालानंतर जाट लोक बरेच नावारूपास आले. आपसांतील द्वैतभाव विसरून, आपण सारे एका जातीचे लोक आहों, असें ते समजू लागले व आपणां सर्वांस नियमन करणारा असा कोणी योग्य मनुष्य आपला प्रमुख असावा, असें त्यांस वाढू लागले. नंतर इ० स० १७२९ साली, महमदशाह बादशाहाच्या कारकीर्दीत, सर्व जाटांनी मिळून चूडामणि नामक एका जाटास, आपलें प्रमुखत्व दिले. या चूडामणि जाटानें, दिल्लीचे सय्यदबंधु-सय्यद हुसेनखां व सय्यद अबदुल्ला यांस साहाय्य केले होते, ते उपकार फेडण्यासाठी त्या सय्यदबंधूंनी त्यांस दोन लाख मोहोरा बक्षीस दिल्या. या सय्यद बंधूंचा पराभव दिल्लीच्या बादशाहाने केल्यावर, त्यांस मदत करणाऱ्या चूडामणि जाटाचे पारिपत्य करण्याचा त्याने हुकूम सोडिला, परंतु चूडामणि लवकरच मरण पावल्यामुळे तो हुकूम अमलांत आणितां आला नाही. चूडामणीच्या पश्चात् , त्याचा मुलगा जाटांचा राजा झाला; त्यास पकडून आणण्याकरितां बादशाहाने आपले लष्कर पाठविलें; परंतु जाट लोकांनी मोठा पराक्रम करून त्या सैन्याचा अगदी मोड करून टाकिला! सुप्रसिद्ध सूर्यमल जाट हा चूडामणीचा नातू होय. त्याने आपल्या बापाच्या पश्चात् , जाटांचे प्रमुखत्व पतकरून, लूट