पान:भरतपुरचा वेढा.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही लोक असे सांगतात की, जाटांचा व रजपुतांचा विवाहसंबंध होत नाही, परंतु तसे काहीं विवाह पंधराव्या शतकांत झाले होते, असें कर्नल टॉड यांच्या 'राजस्थान' ग्रंथावरून समजते. जाटांत कांहीं जाट हिंदु, कांहीं शीख व कांहीं मुस__लमान असून, हिंदु जाटांतही, मुसलमानांचे कांहीं आचारविचार पाळण्यांत येतात. त्यांच्यांतील कांहीं पोटजातींत 'नियोगविधीची' ह्मणजे वडील भाऊ मेला असता, त्याच्या स्त्रीशी त्याच्या धाकट्या भावाने विवाह करण्याची चाल असून, या चालीस ते लोक 'चादरचलन' असें ह्मणतात. भरतपुरचा जाट राजवंश हिंदु आहे. जाट लोकांची, यापेक्षां अधिक माहिती कोणास पाहिजे असेल तर त्याने बाल्फर साहेबांचा सैक्लोपीडिया आफ इंडिया हा ग्रंथ पहावा. प्रकरण दुसरें. सुप्रसिद्ध फारशी ग्रंथकार फिरस्ता याने जाटवंशीय राजांचा जो ऐतिहासिक वृत्तांत दिलेला आहे, तो येणेप्रमाणे:भरतपुरच्या वर्तमान राजवंशाचा मूळ पुरुष, पंजाबांत, सिंधू नदाच्या पलीकडे, राहात असे. तो मोठा बलशाली व साहसी मनुष्य होता. तो पहिल्याने लुटारूपणा करीत असे. नंतर काही दिवसांनी, तो सिंधु नदाच्या अलीकडे, मुलतान शहरानजीक येऊन राहिला. इसवी सन १०२६ त, गिझनीचा महमूद गुजराथेत फिरत असतां, त्याने जाट लोकांच्या एका सैन्यास वेढा देऊन त्यांतील बहुतेक लोक ठार मारिले! इ. स. १३९७ त, तैमुरलंगाने दिल्लीवर स्वारी केली, त्या वेळीही, जाट लोकांकडून त्यास पुष्कळ उपद्रव झाल्यामुळे,