पान:भरतपुरचा वेढा.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करून पुष्कळ द्रव्य संपादिले व अनेक पराक्रम केले. बल आणि साहस ही एकत्र झाली की, तेथें लक्ष्मी हात जोडून उभी राहिली ह्मणून समजावें. सूर्यमल जाटाचा पराक्रम अवलोकन करून जयपुरचा राजा फार खूष झाला व प्रसंगविशेषीं त्याने आपल्या उपयोगी पडावें ह्मणून, त्यास सर्वप्रकारें साहाय्य करूं लागला. अशा प्रकारे उत्तेजन मिळत गेल्यामुळे, सूर्यमल जाटानें, इ. स. १७७० त, डीग आणि कुम्भीर या नांवाचे दोन प्रचंड किल्ले बांधिले. यानंतर त्यास अशी महत्वाकांक्षा उत्पन्न झाली की, भरतपुर हे दुर्भेद्य स्थान आपले राजधानीचे शहर करावें, व त्याप्रमाणे आपल्या जाट अनुचारांसह तो तेथे जाऊन राहिला. जयपुरचा राजा, सूर्यमलाशी पुढे द्वेषबुद्धीने वागू लागला. काही दिवसांनंतर गाजीउद्दीन, मराठे व जयपुरकर यांच्या एकवट झालेल्या लष्कराबरोबर, सूर्यमलास लढाई करणे भाग पडलें, व त्यांत विजयश्रीने शेवटी त्यालाच माळ घातली. यापूर्वी, सन १७५६ त, सूर्यमलाने आपल्या नांवामागें राजा हे पद धारण केले होते. याच वेळी, अहमदशाह अबदाल्ली दुराणी याने हिंदुस्थानावर स्वारी केली. मराठ्यांचे सर्व सैन्य एकत्र होऊन त्यास प्रतिबंध करण्यासाठी दिल्लीकडे येत असतां, राजा सूर्यमल आपल्या ३०,००० फौजेसह त्यांस जाऊन मिळाला होता, परंतु दुर्दैवाची गोष्ट ही की, मराठ्यांचा अभिमानी सेनापति भाऊसाहेब यांचे युद्धधोरण त्यास पसंत न पडल्यामुळे, सूर्यमल असंतुष्ट होऊन मराठ्यांचे सैन्य सोडून गेला! जर असा प्रसंग न येता, व सुभेदार मल्हारराव होळकर व राजा सूर्यमल या कसलेल्या सेनापतींच्या बहुमोल मसलतीचा निषेध सदाशिवरावभाऊंनी केला नसता, तर पानिपतच्या लढाईत