पान:भरतपुरचा वेढा.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

“महादेवाच्या जटेपासून उत्पन्न झाले ते जाट होत'! कोणी मणतो, 'जाट हे यदुवंशीय आहेत.' प्रसिद्ध इतिहासकार कर्नल टॉड व विल्सन साहेब यांचेही असेंच मत आहे. कोणी ह्मणतात की जाट लोक चंद्रवंशी आहेत व दुसऱ्या कोणाचें मत असें आहे की, ते सूर्यवंशी आहेत! कोणी त्यांना रजपूत ह्मणतात. याशिवाय, त्यांच्या संबंधानें एक चमत्कारिक दंतकथाही प्रचारांत आहे. एके दिवशीं एक गुर्जर जातीची स्त्री डोईवर पाण्याने भरलेली कळशी घेऊन रस्त्याने चालली होती, इतक्यांत एक मोठा पुष्ट रेडा बेफाम होऊन तिकडून धांवत आला. त्या स्त्रीच्या डोईवर एवढे भारी ओझें असतांही तिने त्या पळणाऱ्या रेड्याच्या गळ्यांतील दोर इतक्या जोराने ओढून धरिला की, त्यास एक पाऊलही पुढे टाकतां येईना! हा विलक्षण प्रकार, तिकडून एक रजपूत राजा घोड्यावर बसून चालला होता, त्याच्या दृष्टीस पडतांच, त्या स्त्रीच्या अलौकिक शरीरसामर्थ्याचे त्यास मोठे आश्चर्य वाटले. त्या स्त्रीसंबंधाने त्याचा ग्रह इतका चांगला झाला की, त्याने शेवटी तिच्याशी आपला विवाह केला. त्या स्त्रीपासून राजास जी संतति झाली, तेच हे जाट लोक होत.' ही जात फक्त भरत. पुरांतच आहे असे नाही, तर दिल्ली, रोहिलखंड, सिंध इत्यादि प्रांतांतही हे लोक आढळतात. या लोकांच्या 'पाचादी' आणि 'हिली' अशा दोन पोटजाति असून त्यांपैकी 'पाचादी' जातीसंबंधानें, मातारे पंजाबी लोक, थट्टेच्या प्रसंगी, खालील कवितांचा उपयोग करितातः 'बूढी भैंस, पुराना गाडा। काला सांप और सगा पछादा। कुछ लाभ हुवा तो हुवा न खादर खादा ॥