पान:भरतपुरचा वेढा.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भरतपुरचा वेढा. प्रकरण पहिले. भरतपुर हे प्रसिद्ध संस्थान राजपुतान्यांत असून त्याची लांबी ७६ मैल व रुंदी ६२ मैल आहे. त्याचे उत्तरेस गुरगांव जिल्हा, पूर्वेस मथुरा आणि आग्रा हे जिल्हे व पश्चिमेस व दक्षिणेस धोलपुर, जयपुर व अलवार ही रजपूत संस्थाने असून त्याचे एकंदर उत्पन्न सुमारे तीस लक्षांचे आहे. लोक शूर असून काटक आहेत. संस्थानाचा राजा जाट रजपूत असून, राजपुतान्याचां पोलिटिकल एजंट त्याजवर देखरेख ठेवितो. राजधानीचे शहर भरतपुर में राजपुतान्यांतील मोठ्या व इतिहासप्रसिद्ध शहरोंपैकी एक असून त्याची लोकसंख्या सुमारे ७५,००० आहे. भरतपुरच्या राज्यांतील अत्यंत प्रेक्षणीय स्थळ मटले ह्मणजे भरतपुर शहराचा दुर्भेद्य तट, हे होय. हा प्रचंड तट, इ० स० १७७३ त, महाराणा बदनसिंह याने बांधविला. आमच्या देशास भारतवर्ष किंवा भरतखंड हे नांव पडण्यास जे कारण झाले, त्याच कारणाने या शहरास भर- 0 तपुर हे नांव मिळाले आहे, असे डॉ० हंटर यांनी आपल्या पुस्तकांत लिहिले आहे. भरतपुरचा राजवंश जाटजातीय असून प्रजाजनही बहुतेक त्याच जातीचे आहेत. शिवाय काहीं मुसलमान व जैनही आहेत. 'जाट' शब्दाच्या उत्पत्तीसंबंधानें, त्या देशांतील लोकांकडून अनेक दंतकथा सांगण्यांत येतात. कोणी ह्मणतो.