पान:भरतपुरचा वेढा.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५१ मोड झाला होता, तो बुरुज आतां त्यांच्या हाती आल्यामुळे त्यांस जयाची आशा उत्पन्न झाली. __ इंग्रजी सैन्याने याच वेळी, गोपाळगड' या नांवाचे आणखी एक स्थान घेतले व त्या सैन्याची एक तुकडी शहरांत घुसण्याचा प्रयत्न करू लागली. इंग्रज अगदीं सन्निध आले असे पाहतांच, जाट सैन्य शहरांत पळू लागले. या वेळी बहुतेक जाट शिपाई पळून गेले होते व फक्त ४,००० जाट इंग्रजांशी अद्याप मोठ्या शौर्याने लढत होते. मेजर हंटर हा इंग्रजी योद्धा या युद्धांत फार घायाळ झाला. तटाच्या दरवाजापाशी इंग्रजी शिपायांनीही अनेक जाट मारिले. इंग्रज आतां शहर हस्तगत केल्याशिवाय राहत नाहीत अशी खात्री झाल्याचर, जाटांनी त्यांस मोठ्या जोराचा प्रतिबंध केला, परंतु ईश्वरी इच्छा काही निराळीच होती ! त्यामुळे जाटांच्या शौर्याचा कांहीं उपयोग न होतां शेवटी इंग्रजांनी भरतपुर शहर घेतलें !! अनेक जाट कैदी झाले. दुर्जनसालही रात्रीचा काळोखांतून पळून जात असतां इंग्रजांकडून पकडला गेला. दुर्जनसालाचे साहाय्यकर्ते कीर्तनराम व कीर्तनवल्लभ हे दोन्ही रजपूत योद्धे यापूर्वीच धारातीर्थी पतन पावले होते. दुर्जनसालाचा मेहुणा व शूर जाट योद्धा खरसालसिंह याचीही तीच दशा झाली होती. इंग्रजांस फितूर झालेला जाट सरदार मधुसिंह हा सर्वस्वी इंग्रजांच्या स्वाधीन झाला व त्यांचे पेन्शन खात स्वस्थ बसला ! एकंदरीत, आत्मद्रोह हे सर्व नाशाचे मूळ आहे व त्यामुळेच भरतपुरच्या प्रतापी राज्याचा स्वातंत्र्यचंद्र मावळला ! मागील युद्धांत ज्या भरतपुरकरांनी जगद्विजयी इंग्रजांस चांगला हात दाखविला होता, तेच भरतपुरकर आतां आत्मद्रोहवश झाल्यामुळे