पान:भरतपुरचा वेढा.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुर्बळ होऊन त्याच इंग्रजांचे सर्वस्वी दासानुदास बनले ! एकटें भरतपुर जिंकल्याने इंग्रजांचा एवढा फायदा झाला की, यानंतर दुसरे अनेक राजे त्यांस भराभर शरण येऊ लागले. __ या युद्धांत ६० लोखंडी तोफा, ७३ पितळेच्या तोफा व अगणित द्रव्य इंग्रजांस मिळाले. या द्रव्यांतून, ४१ लक्ष ११ हजार ३५ रुपये १० आणे आणि ५ पै एवढी रकम इंग्रजांनी आपल्या विजयी सैन्यास वांटून दिली! भरतपुराकडील लोक असे सांगतात की, मोहोरांची लालूच दाखवून इंग्रजांनी अनेक जाट वीरांस आपलेकडे वळवून घेतले होते, व याच कृत्याच्या जोरावर त्यांस जयप्राप्ति झाली. हिंदुस्थानांतल्या आलीकडच्या लढायांत जे पर्याय होत आले, तेच ह्या लढाईत झाले. भरतपुरकरांचा असा समज होता की, जोपर्यंत एक घड्याळमासा येऊन खंदकांतील पाणी शोषण करूं लागला नाही तोपर्यंत भरतपुरचा किल्ला दुसऱ्यांच्या हाती लागायाचा नाही. शेवटी कोंबरमीर साहेबाने भरतपुर जिंकिलें तेव्हां, कोंबरमीर याचा कुम्भीर ह्मणजे घड्याळमासा असा अपभ्रंश करून, जाटांनी आपल्या विधानाची सत्यता सिद्ध करून समजूत करून घेतली. समाप्त.