पान:भरतपुरचा वेढा.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ता०१७ रोजी, इंग्रजी सेनापतीस असे वाटले की, आतां विनाकारण वेळ दवडण्यात अर्थ नाही. आणखी एक दोन दिवस असाच प्रकार चालू राहिल्यास आपल्या सैन्याचे फार हाल होतील व प्राणरक्षणार्थ आपणास शेवटीं पळून जाणे भाग पडेल. तस्मात् आजच्या आज याचा कायतो सोक्षमोक्ष करून टाकावा हे बरें. असा विचार ठरल्यावर, दुसरे दिवशी इंग्रजांनी, शहरावर मोठ्या निकराचा हल्ला केला व ता० १८ रोजी सकाळी ते भरतपुरच्या तटास येऊन भिडले. किल्ल्याच्या ईशान्य दिशेस, इंग्रजांनी तोफा ठेवण्याचा जो मोर्चा उभा केला होता, तिकडे जाऊन व तेथील सुरुंगांत दारू भरून इंग्रजी सैन्याने त्यास आग लाविली. सुरुंग इतक्या जोराने उडाला की, पांच सात जाट जागच्या जागी मरून पडले व इंग्रजी सैन्यांतील शेकडों लोक मेले व जखमी झाले. या वेळी इंग्रज अगदी घाबरून गेले, कारण, 'केले तुला तें झाले मला' अशी त्यांची स्थिति झाली ! परंतु सेनापतीच्या उत्तेजक शब्दांनी इंग्रजी शिपायांस पुनः मोठी चीरश्री चढली व ते दुप्पट जोराने लहू लागले. पूर्वीचा सेनापति घायाळ झाल्यामुळे सैन्याचे आधिपत्य कर्नल नेशन यास देण्यात आले होते. परंतु तो तटाच्या सन्निध जाऊन पोचतो न पोचतो, तोच तोही जखमी झाला ! सेनापतीची अशी अवस्था केल्यावर त्याच्या सेनेचे काय चालणार, अशीच जणू काय जाटांची समजूत होती. या वेळी कर्नल डिलामेन हा आपल्या हाताखालच्या सैन्यासहित तटाच्या खिंडारापाशी येऊन मोठ्या साहसाने तटावर चढला! क्रमशः दुसरे इंग्रज शिपाईही तिकडे जमू लागले. जाट मोठ्या शौर्याने लढत होते. परंतु त्यांच्या माऱ्याची पर्वा न करितां इंग्रजी सैन्य फत्तेबुरुजापर्यत जाऊन पोहोंचलें व तटावर चढून अनेक शिपाई ठिकठिकाणी उभे राहिले. ज्या फत्तेबुरुजानजीक, पूर्वीच्या युद्धांत इंग्रजांचा