पान:भरतपुरचा वेढा.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ तोफ अकस्मात् फुटल्यामुळे पांच सात इंग्रज गोलंदाजांचे राईएवढे तुकडे झाले! शेवटी किल्लयांत शिरण्याचे काम सोडून देणे इंग्रजांस भाग पडलें !! ता० ६ जानेवारी रोजी, इंग्रजांनी पुनः किल्लयांत शिरण्याचा उद्योग आरंभिला. खंदकावर पूल बांधिला होता, त्यावरून तटाजवळ येऊन पाहतां त्यांस असे आढळले की, तटास में खिंडार पडले आहे, ते फार उंच असल्यामुळे, तेथवर चढून तटांत शिरणे हे मोठ्या मुष्किलीचे काम आहे. मग त्यांनी खंदकाच्या कांठी मोठमोठे खड्डे खणून त्यांत दारू भरून ठेविली व त्यांस आग लावून दिली ! परंतु, या उपायाने तटाच्या केसाएवढ्या भागासही धक्का पोंचला नाही. ता० ७ रोजी, लॉर्ड कोंबरमीर आपल्या सैन्याचे युद्धकौशल्य पाहून फार खूष झाला व त्याने मोठ्या उत्तेजक शब्दांनी आपल्या सैनिकांस तटाच्या आंत घुसण्याचा हुकुम केला. सेनापतीच्या आज्ञेप्रमाणे शिपायांनीही शहरांत शिरण्याच्या कामी आपल्या शौर्याची अगदी शिकस्त केली, परंतु काही उपयोग झाला नाही. सुरुंगास आग लावीत असतां एका साहसी जमादाराचे सर्वांग अगदी होरपळून गेले होते, परंतु मोठ्या नशिबानें वांचला! ता० ८ जानेवारी रोजी दुर्जनसालाने इंग्रजी सेनापतीस निरोप पाठविला की, बलवंतसिंहास राज्यपद् द्यावयास मी तयार आहे, तुही लढाई बंद करा. इंग्रजी सेनापतीने उलट निरोप पाठविला की, बलवंतसिंहास राज्यपद् दिल्याने लढाई बंद होणे अशक्य आहे. जर तुमी स्वतः निमूटपणे आमच्या स्वाधीन व्हाल, तर पुढे लढाई बंद करण्याचा विचार होईल. अर्थातच हे ह्मणणे दुर्जनसालास रुचलें नाही. याच दिवशी, इंग्रजी सैन्यांत एक अत्यंत शोचनीय प्रकार घडून आला. एका