पान:भरतपुरचा वेढा.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४७ चालविला की, सुरुंग तयार करणाऱ्या इंग्रजी शिपायांचा सरदार लेफ्टनंट टिंडाल हा ठार झाला! याच दिवशी, तटाच्या उत्तर व पश्चिम या दिशांच्या मध्ये इंग्रजांनी तोफा ठेवण्याकरितां एक बुरुज बांधिला. ___ ता० २ रोजी, इंग्रज या बुरुजावरून तोफा डागू लागले. किल्लयांतील जाट लोकही आपल्या तोफांकडून त्यांस जबाब देऊ लागले. सगळा दिवस व सगळी रात्र दोघांच्याही तोफा चालू होत्या. जाट लोक तोफा डागण्यांत गुंतले आहेत असे पाहून इंग्रजांनी सुरुंगाचे काम पुनः सुरू करून ते बहुतेक पुरे केलें. ता० ३ जानेवारी रोजी, इंग्रजांच्या इंजिनीअर खात्यांतील लोकांवर कांहीं जाट शिपायांनी हल्ला करून त्यांची एकसहा कत्तल उडविली ! या दिवशी इंग्रजांनीही जाटांवर रागाने आपल्या तोफा चालविल्या. रात्रीच्या वेळी सुरुंगाचा काही भाग पुरा करण्यांत आला. ता० ४ रोजी इंग्रजी तोफांच्या भयंकर माऱ्याने तटाचा बराच भाग तुटून पडला, विशेषतः दक्षिणेच्या बाजूचा भाग तुटून तेथे मोठेच खिंडार पडले होते. तोफांच्या घनघोर गर्जनेने सारे भरतपुर शहर अगदी दुमदुमून गेले होते, व आकाश धूम्रमय होऊन गेले होते. ता० ५ रोजी, तटास पडलेल्या खिंडारांतून शहरांत शिरण्याची इंग्रजांनी तयारी केली. खिंडारापाशी जमा झालेल्या जाट सैन्याची फळी फोडून आंत घुसण्यास इंग्रजी सैन्य अगदी उत्सुक झाले होते. या झटापटींत, जाटांशी हातघाई करण्याचा प्रसंग आल्यामुळे इंग्रजांचे ५२० लोक मरण पावले ! रात्रौ साडे आठ वाजतां, कांहीं साहसी जाट वीर शहराबाहेर आले व बुरुजापाशी असलेल्या शत्रुसैन्यावर वाघासारखे तुटून पडले. उभयपक्षांची मोठी लढाई झाली व दोघांचेही बहुत नुकसान झाले. या लढाईत इंग्रजांची एक