पान:भरतपुरचा वेढा.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ तोफखाना बंद झाल्यावर, इंग्रजांनी तटांत शिरण्याकरितां रस्ता बांधण्याचे काम सुरू केले. रात्रौ पुनः जाटांचा मारा चालूच होता. ता० २५ डिसेंबर रोजी रात्री, एका ख्रिस्ती सणानिमित्त इंग्रजी सैन्य मोठ्या आनंदात असतां, भरतपुरकरांनी त्यावर एकाएकी हल्ला केला, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे कार्यभाग घडून आला नाही. ता० २६ डिसेंबर रोजी, इंग्रजी सैन्यांतून पुनः तोफांचे गोळे भरतपुराकडे येऊ लागले. या गोळ्यांनी तटाचा पूर्वेकडील बराच मोठा भाग तुटून पडला होता. याच दिवशी रात्री, बलदेवसिंहाच्या बगीच्यांतील इंग्रजांवर जाटांनी हल्ला केला होता. लढाई झाली; परंतु त्यांत कोणाचेही ह्मणण्यासारखें नुकसान झाले नाही. शहराच्या उत्तरेकडील जागी तोफा ठेवण्याकरितां इंग्रज लोक मोर्चा बांधित असतां, भरतपुरकरांनी त्यांस पळवून लाविले होते. तेव्हापासून ता० ३१ डिसेंबर पर्यंत, दोन्ही पक्षांच्या तोफा एकसारख्या चालू होत्या. हर्बर्ट या नांवाचा एक इंग्रज गोलंदाज जाटांस येऊन मिळाला होता. या फितुरी माणसाच्या सांगण्यावरून, जाटांनी इंग्रजी सेनापतीच्या सैन्यावर तोफा डागिल्या, परंतु त्याचा एक खिदमतगार मरण्यापलीकडे त्याचे काही विशेष नुकसान झाले नाही. यानंतर १८ दिवस, इंग्रजांची व जाटांची लढाई एकसारखी चालू होती. सन १८२६ ता० १ जानेवारी रोजी, इंग्रजांनी भरतपुरच्या तटाबाहेरील खंदकापर्यंत एक सडक तयार केली. ही सडक अशा प्रकारें बांधिली होती की, तिजवरून जाणार इंग्रजी सैन्य जाटांच्या बिलकूल दृष्टीस पडूं नये. या सडकेन येऊन इंग्रजी सैन्याने, तटाजवळ एक मोठा सुरुंग तयार केला होता, परंतु इंग्रजांची ही सर्व हातचलाखी जाटांच्या तत्काळ ध्यानांत आली. त्यांनी त्यांजवर तोफांचा असा भयंकर ना