पान:भरतपुरचा वेढा.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न व्हावी ह्मणून, त्यांनी एक मोठा बांध घालून खंदकांत जाणारे पाणी अडवून टाकिलें. भरतपुरांतील जाट लोकांनी खंदकांत पाणी सोडण्याचे काम सुरू केले होते, परंतु या इंग्रजी बांधामुळे तें काम पूर्णतेस जाणे अशक्य झाले. तटाबाहेर इंग्रजी सैन्य जमा झालेले पाहतांच, खंदकांत पाणी सोडणारे जाट शिपाई शहरांत निघून गेले. इकडे इंग्रजी सैन्य, अगदी तटास येऊन भिडले व त्यामुळे भरतपुरांतील नागरिक लोक बियाना, डीग, बलमपाड, कुम्भीर वगैरे ठिकाणी पळत सुटले ! इंग्रजी सैन्याचे साहस पाहतांच जाट शिपाई सावध झाले व त्यांनी तटावरील तोफा इंग्रजी सैन्यावर सोडण्यास प्रारंभ केला. या माऱ्याने इंग्रजांचे ह्मणण्यासारखें नुकसान झालें नाहीं; फक्त बड्या इंजिनीयर साहेबांचा एक हात असा उडून गेला की त्याचे चिन्हही राहिले नाहीं !! ___ता० ११ डिसेंबर रोजी जनरल निकल्स हा भरतपुरापासून ७ मैलांवर, 'उंचा' या नांवाचा एक गांव आहे, तिकडून भरतपुराकडे येऊ लागला. लेफ्टनंट कर्नल फेथफुल हा 'माली' नामक गांवावरून भरतपुराकडे येऊ लागला. तेव्हां त्याचे लष्कर पाहतांच ग्रामवासी लोक आपापली घरेदारे सोडून पळून गेले! 'माली' गांवांतून, भरतपुरचा तट कोणत्या स्थितीत आहे, हे सहज समजण्यासारखे होते. तेथील इंग्रजी सैन्याने गांवाच्या एका बाजूस एक मोठा खंदक खणला व बाकी तीन बाजूस झाडे व कांटे घालून जाट लोकांस आंत प्रवेश करितां न येईल असा कडेकोट बंदोबस्त केला. पुढे ता० २६ डिसेंबर रोजी, कर्नल फेथफुल साहेब माली गांव सोडून बराच पुढे आला व शहराबाहेरील एक मजबूद ठिकाण त्याने आपल्या ताब्यांत घेतले. या ठिकाणासही त्याने तटबंदी करविली होती.