पान:भरतपुरचा वेढा.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंतून फितुर झाले होते. जाटांचे गृहच्छिद्र जाणण्याच्या कार्मी या नीच लोकांचा इंग्रजांस चांगलाच उपयोग झाला. मागील युद्धांत, इंग्रजी सैन्याची व्यवस्था बराबर नसल्यामुळे त्यांस माघार घ्यावी लागली होती, परंतु या प्रसंगी तसें न व्हावें ह्मणून इंग्रजी सेनापतीने आपल्या सैन्याची व अन्नसामुग्रीची व्यवस्था उत्तम प्रकारे ठेविली होती. जनरल कोंबरमीर यास इंग्रजी सैन्याच्या सेनापतीची जागा देण्यात आली होती. त्याने आपल्याबरोबर १६२ तोफा घेतल्या होत्या. चांगल्या इंजिनियरांच्या अभावामुळे मागील युद्धांत अपजय सोसावा लागला असें लार्ड लेक याने विधान केले होते. परंतु, या वेळी असली विधाने करून वेळ मारून नेण्यास जागा राहूं नये ह्मणून चांगले नामांकित इंजिनीयर इंग्रजी सैन्याबरोबर देण्यात आले होते. तापलेलें दूध पितांना तोंड भाजल्यामुळे दहीं कुंकून खाणाऱ्या गृहस्थाप्रमाणे इंग्रजांची या वेळी स्थिति झाली होती. एक वेळ चांगली ठोकर लागल्यामुळे ते आतां दुप्पट शाहाणे झाले होते, व या युद्धांत जाटांचा आपण पुरा मोड करूं अशी त्यांची खात्री होती. इंग्रजी सेनापति लार्ड कोंबरमीर यानें, इ० स० १८२५, ता० ९ डिसेंबर रोजी, आपल्या लष्कराची पहिली तुकडी भरतपुराकडे रवाना केली व त्या तुकडीतील योद्धे जनरल रेनेल व स्ले हे भरतपुर शहराच्या उत्तर व पश्चिम या दिशांच्या मध्ये एका जागी खंदक खणून आपापल्या सैन्यासह मोठ्या बंदोबस्ताने राहिले. भरतपुरच्या तटाबाहेरील खंदकांतील पाणी कमी व्हावें ह्मणून इंग्रजांनी एक नवीच युक्ति अमलांत आणिली होती. मागील युद्धांत, या खंदकांतील दुस्तर जलप्रवाहामुळे इंग्रजांची फार खराबी झाली होती. परंतु या खेपेस तशी खराबी