पान:भरतपुरचा वेढा.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ असे नव्हे, तर तो मूळचाच तसा होता, व त्यावरून त्याने काही दिवस तरी राज्यसुखाचा अनुभव घ्यावा, असा ईश्वरी संकेतच होता, असे दिसते. भरतपुर शहरांतील बहुतेक सरदार त्याने वश करून घेतले होते. जाट सैन्यावर त्याचा मोठा दरारा होता, व त्या वेळचा प्रसिद्ध जाट योद्धा खुरासलसिंह व जयपुरचा विद्वान् पुरोहित नंदकुमार, हे त्याचे परममित्र होते. नंदकुमार यास राजपुतान्यांत त्या वेळी मोठा मान होता, व सर्व लोकांवर त्याचे मोठे वजन होते. रजपुत व जाट लोक त्यास 'श्रीजी' असें ह्मणत असत. याशिवाय भरतपुरचे साहसी सरदार कीर्तनराम व कीर्तनवल्लभ हे दुर्जनसालाचे मोठे पक्षपाती असून, त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक कामांत ते त्यास मनापासून साहाय्य करीत असत. एकंदरीत या सर्व प्रकारच्या अनुकूलतेमुळे दुर्जनसालाची लढाईची तयारी अगदी पूर्णावस्थेस पोंचली होती. भरतपुरच्या किल्लयांत २०,००० पायदळ असून त्यांतील ८,००० शिपाई तर चांगले युद्धनिपुण होते. बाकीच्या शिपायांची नुकतीच भरती केलेली असल्यामुळे त्यांस इतके चांगले शिक्षण मिळाले नव्हते. याप्रमाणे युद्धाची तयारी जरी अगदी चांगली झाली होती, तरी ज्या ऐक्याच्या अभावामुळे हिंदुस्थान देशास आज ही अवनति प्राप्त झालेली आहे, ते ऐक्य नसल्यामुळे भरतपुरकरांचा पक्ष या वेळी एक प्रकारें कमजोर झालेला होता. पूर्वी, त्यांच्या इंग्रजांशी ज्या लढाया झाल्या, त्या वेळी भरतपुरच्या राज्यांतील रावापासून रंकापर्यंत सर्व लोक स्वराज्यरक्षणार्थ जिवावर उदार होऊन लढत होते व त्यामुळेच इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूशीं दोन हात करण्यास ते समर्थ झाले; परंतु या वेळी लोकांची एकवाक्यता नष्ट झाली होती, व अनेक जाट लोक इंग्रजांस