पान:भरतपुरचा वेढा.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१ गाइली असती; परंतु तसे झाले नाही. त्या भानगडींत खरा प्रकार काय आहे तो कळत नाही. बाकी, राजकारणांत लोभ तर बुडी नेहमी असतोच. असो. ___ भरतपुरावर हल्ला करण्याची इंग्रजांनी तयारी चालविली आहे, ही हकीकत दुर्जनसालास समजली तेव्हां त्यास असे वाटले की, आज नाहीं उद्यां केव्हां तरी इंग्रजांशी दोन हात करण्याचा आपणास प्रसंग येणार खास. मग, त्यानेही लढाईची तयारी मोठ्या जोराने चालविली. आरंभी इंग्रजांनी लढाईची तयारी केली होती, परंतु लढाई करूं नये असा वरिष्ठ सरकारचा अकस्मात् हुकूम आल्यामुळे, पुढें तें प्रकरण थंड पडल्यासारखें झालें होतें व पुनः जिकडे तिकडे चांगली शांतता झाली होती. तेवढ्या वेळांत दुर्जनसालाने आपल्या सैन्याची चांगली तयारी केली होती व तो लढाईची अगदी वाट पहात बसला होता. त्याने आपल्या विश्वासाच्या लोकांस आपल्या सैन्यांत मोठमोठ्या जागा दिल्या होत्या, नवीन लोकांची भरती केली होती व अन्नसामुग्रीचाही भरपूर सांठा करून ठेविला होता. परंतु कोणत्याही युरोपियनास आपल्या लष्करांत नोकरीस ठेवू नये, असें जें रणजितसिंह व इंग्रज यांजमध्ये झालेल्या तहाचे एक कलम होते त्याच्या विरुद्ध मात्र त्याने बिलकूल वर्तन केले नाही. दुर्जनसालाने आपल्या चुलत्याचा खून केला होता की तो दुसऱ्या कोणी केला होता, याबद्दलचा कांहींच पुरावा पुढे आला नव्हता. त्याने भरतपुरचे राज्य जरी पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले होते, तरी आपल्या मागें 'राजा' हा किताब धारण केला नव्हता. वास्तविक पाहतां, दुर्जनसाल ह्मणजे काही सामान्य प्रतीचा मनुष्य नव्हता, तर तो मोठा शक्तिमान् व साहसी पुरुष होता. सर्व राज्य त्याच्या हाती आल्यामुळे तो शक्तिमान् झाला होता