पान:भरतपुरचा वेढा.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या जाहिरनाम्याचा भावार्थ येवढाच आहे की, दुर्जनसालाने, बलवंतसिंहास पदच्युत करून भरतपुरची गादी अन्यायाने बळकाविली आहे, यामुळे, बलवंतसिंहास गादीवर बसविण्याकरितां, भरतपुरावर चाल करून जाणे आमांस भाग पडत आहे. वास्तविक पाहतां बलवंतसिंहास गादी देण्याच्या निमित्ताने लढाईचा प्रसंग आणण्याचे इंग्रजांस मुळीच प्रयोजन नव्हते. भरतपुरकर व इंग्रज यांजमध्ये झालेल्या तहाप्रमाणे या वेळी, इंग्रजांनी स्वस्थ बसावयास पाहिजे होते. सिंहासनाकरितां जो झगडा सुरू झाला, तो भरतपुरच्या राज्यांत सुरू झाला होता. त्याशी इंग्रजांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. ज्या वेळी बलदेवसिंहानें, आपल्या मागें, आपला मुलगा बलवंतसिंह यास गादीवर बसविण्याविषयी इंग्रजांस विनंती केली होती, त्या वेळी ती विनंती त्यांनी अमान्य करावयास पाहिजे होती, व तसे करावयास त्यांजपाशी बळकट कारणेही होती. त्यांनी बलदेवसिंहास असे सांगितले पाहिजे होते की, बलदेवसिंहजी, तुमच्या मागे तुमच्या मुलास गादी मिळावी अशी जर तुमची इच्छा आहे, तर त्या संबंधाने सर्व व्यवस्था करावयास तुमी स्वतः मुखत्यार आहां. तुमचा पिता रणजितसिंह याशी जो आमचा तह झालेला आहे त्या तहाप्रमाणे, तुमच्या राज्यांतील खाजगी गोष्टींत ढवळाढवळ करण्याचा आमांस बिलकूल अधिकार नाही, व झालेला तह मोडून तुमची विनंती मान्य करणे हेही सर्वथा अनुचित होय. खरोखरच, इंग्रजांनी बलदेवसिंहास जर या प्रमाणे सरळ उत्तर देऊन, भरतपुरच्या राज्यकारभारांत आपणांस गोंधळ घालितां यावा ह्मणून, लढाई सुरू केली नसती, तर त्यांच्या मनाचा मोठेपणा व व्यवहाराचा प्रामाणिकपणा स्पष्ट दिसून आला असता, व त्याबद्दल इतिहासकारांनी त्यांची स्तुति