पान:भरतपुरचा वेढा.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___ची तयारी करावयास आपणास वेळ मिळावा याच उद्देशाने हें तहाचे थोतांड उभे करून, दुर्जनसालाचा वकील इतका विनय दाखवीत आहे व राजनीतीच्या लांब लांब गोष्टी सांगत आहे; याशिवाय, असे करण्यांत त्याचा दुसरा हेतु बिलकूल नसावा. मग त्याने वकिलाचे बोलणे अमान्य करून त्यास निरोप दिला, व लढाई करण्याच्या हेतूनें तो सैन्याची जमवाजमव करूं लागला. सैन्य गोळा करण्याचे काम मेजर जनरल रेनेल याजकडे सोपविण्यात आले होते. प्रकरण दाहावें. कित्येक इंग्रज ग्रंथकार असे लिहितात की, 'जर दुर्जनसाल भरतपुरच्या राज्याशी असलेला आपला संबंध सोडून द्यावयास कबूल असेल, तर युद्ध करावे की न करावे याबद्दलचा विचार करण्यांत येईल,' असें आक्टरलोनी साहेबाने दुर्जनसालाच्या वकिलास सांगितले होते. साहेबाचे हे मत त्या वकिलास पसंत पडलें नाहीं, व त्याप्रमाणे त्याने दुर्जनसाल यास लिहून कळविलें. तहाचे कार्य वकिलाकडून घडणे अशक्य वाटल्यामुळे, दुर्जन साल यानें, राजा बलवंतसिंह यास बरोबर घेऊन, स्वतः आ__क्टरलोनी साहेबास भेटण्याचा बेत केला होता व, हा बेत आ क्टरलोनी साहेबासही पसंत पडला होता; परंतु काही कारणामुळे तो शेवटी सिद्धीस गेला नाही. असे होण्याचे कारण काय होते, याचा कोणत्याही इतिहासांत उल्लेख केलेला नाही. दुर्जनसाल हा भरतपुरच्या राज्यांत मोठा पराक्रमी व साहसी पुरुष असल्यामुळे, भरतपुरच्या गादीशी असलेला आपला संबंध तोडून टाकावयास तो एकाएकी कबूल झाला नाही, तर त्यांत कांहीं मोठेसें आश्चर्य नाही. भर० ४