पान:भरतपुरचा वेढा.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यास असे कळविले की, तुमचा मजवर जो रोष झाला आहे, त्याजबद्दल मी फार दिलगीर आहे. वास्तविक पाहिले असतां, भरतपुरच्या राजवाडयांत जी काही अनन्वित कृत्ये व रक्तपात झाले, त्यांच्याशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. येवढंच नव्हे, तर ती कृत्ये घडून येईपर्यंत मला त्यांतलें कांहीएक ठाऊक नव्हतें ! राजाच्या चुलत्याचा वध मी केलेला नसून, तो मारला जाण्यास त्याची स्वतःची राक्षसी कृत्येच कारण झालेली आहेत. लोक त्याच्या अत्याचारास कंटाळून गेले व शेवटी त्यांनी त्यास देहान्त प्रायश्चित्त दिले ! त्याच्या वधाशी माझा बिलकूल संबंध नव्हता. सर आक्टरलोनी यानें, दुर्जनसालाच्या या खुलाशावर, बिलकल विश्वास ठेविला नाहीं; तेव्हां निराश होऊन दुर्जनसालाच्या वकिलाने, आक्टरलोनी साहेबास विनयपूर्वक विनंति केली की, आमचे भाषण तुझी सत्य मानीत नाही किंवा तुमच्या सार्वभौमत्वाच्या कबुलीचे कागदपत्र आह्मी तुझांस द्यावयास तयार आहों, त्यांचाही तुझी स्वीकार करीत नाही; तस्मात् , आहीं आतां पुढे काय करावे, हे तुमीच आमांस सांगा. जर आमांस तुह्मांकडून अद्याप थोडी मुदत देण्यात येईल, तर आमच्या भाषणाची सत्यता पुराव्यानिशी तुमच्या निदर्शनास आणून यावयास आह्मी तयार आहों. याकरितां माझी आपणास हात जोड़न प्रार्थना आहे की, घाईनें युद्धाचा प्रसंग आणून विनाकारण आमच्या राज्याचा नाश करूं नये, व गरीब बिचाऱ्या शिपायांस मरणाच्या तोंडी देऊ नये; तर, तुमी स्वतः या गोष्टीचा चांगला विचार करून व उभय पक्षांचा समेट करून तंट्यांचे बीज काढून टाकावे, हे अधिक श्रेयस्कर व मुत्सद्देगिरीस शोभण्यासारखे होय. आक्टरलोनी साहेबाने विचार केला की, युद्धा