पान:भरतपुरचा वेढा.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ जाट लोकांस युद्धाची तयारी करावयास वेळ मिळू न देतां, भरतपुर शहरावर झटपट हल्ला करून दुर्जनसालाची खोड मोडावी, अशी आक्टरलोनी साहेबाची इच्छा होती; परंतु शेवटी ती पूर्ण झाली नाही. इंग्रजांनी लढाईची सर्व तयारी केली होती, इतक्यांत ब्रिटिश सरकाराने असा हुकूम केला की, लढाईचे काम एकदम बंद करावे. या हुकुमानंतर, १८२५ च्या डिसेंबर महिन्यापर्यंत, सर्वत्र सामसूम होते. काही महिने तर असे गेले की, त्या वेळी, जाटांचे व इंग्रजांचें आतां लवकरच युद्ध होणार, अशी कोणास कल्पनाही झाली नसती ! राज्यकारभार अगदी सुरळीतपणे चालला होता. मध्यंतरी सर आक्टरलोनी मरण पावला, व त्याचे जागी सर चार्लस मेटकॉफ यास दिल्लीचा रेसिडेंट नेमण्यांत आले. त्यानें, इ० स० १८२५ ता० २५ नोवेंबर, या दिवशी, 'आमी लवकरच भरतपुरावर हल्ला करणार,' अशा अर्थाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. असें करण्याचे कारण काय होते, हे एकही इंग्रज इतिहासकार सांगत नाही. भरतपुर शहरांत कोणत्याही प्रकारची गडबड चालू नसतां, व जाटांचे इंग्रजांशी मित्रत्वाचे वर्तन असतां, लढाई उपस्थित करून शांततेचा भंग करण्याचे इंग्रजांस काय प्रयोजन होते, याचा इंग्रज इतिहासकारांनी स्पष्ट खुलासा करावयास पाहिजे होता. परंतु, वस्तुस्थिति ज्याअर्थी तशी नाही आहे, त्याअर्थी असें ह्मणावे लागते की, तें राजकारण फार खोल असले पाहिजे, ह्मणून ते बाहेर पडले नाही. ते राजकारण भरतपुरपक्षी होते की इंग्लिशपक्षीं होते, ह्याचा देखील कोठे मागमूस नाही. तेथे इतिहासकारांनी काय करावे ? मेटकॉफ साहेबाचा जाहीरनामा येणेप्रमाणे होताः 56 After the death of Maharaja Baldeosingh, Kour Doorjunsal the son of Luchmun