पान:भरतपुरचा वेढा.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुर्जनसाल याच्या हाती आले, हे उघडच आहे. इंग्रजांचे मणणे अर्से होते की, बलवंतसिंह हा सिंहासनाचा खरा अधिकारी असून ज्या अर्थी त्याचा बाप बलदेवसिंह याच्या अनुमतानें, आही त्यास भरतपुरच्या गादीवर बसविले आहे, त्या अर्थी त्याचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्यकर्म होय. दुर्जनसालाचे ह्मणणे असे होते की, माझा चुलता रणधीरसिंह यास संतति नसल्यामुळे मला दत्तक घेऊन गादीचा वारस करण्याचा त्याचा विचार होता, परंतु तो अकस्मात् मरण पावल्यामुळे, हा त्याचा विचार अंमलांत आला नाही. तथापि, ज्या अर्थी मला दत्तक घेण्याचा त्याचा विचार होता, त्याअर्थी गादीचा खरा अधिकारी मीच । आहे. शिवाय आपल्या पश्चात, बलवंतसिंह यास गादीवर बसविण्याविषयी बलदेवसिंहाने आपणास विनंति केली होती, असे जं इंग्रज ह्मणतात तें सर्व झूट असून, बलदेवसिंहाचाही विचार मलाच गादी देण्याचा होता. दुर्जनसालाचे वरील विधान ऐकून इंग्रजांस मोठा राग आला व त्याचे पारिपत्य करावें ह्मणून भरतपुर शहरावर पुनः हल्ला करण्याचा त्यांनी निश्चय केला. या वेळी, इंग्रजी सैन्याचे प्रमुखत्व, दिल्ली येथील तत्कालीन रेसिडेन्ट सर डेव्हिड् आक्टरलोनी याजकडे देण्यात आले होते. दुर्जनसालाने असा विचार केला की, वलशाली इंग्रजांशी युद्ध करावे लागल्यास त्यांत आपला निभाव लागणे कठिण, व यासाठी युक्तिप्रयुक्तीनें व नम्रतेने इंग्रजांस अनुकूल करून घेण्याचा त्याने प्रयत्न आरंभिला. इं. ग्रजांनी, दुर्जनसाल याने आपल्या चुलत्याचा खून केला, असा त्याजवर आरोप ठेविला होता व राजवाड्यांतील इतर लोकांची कत्तल केल्याबद्दल इंग्रजांचा त्याजवर मोठा रोष झाला होता. दुर्जनसालाने सर आक्टरलोनी याजकडे आपला वकील पाठवून