पान:भरतपुरचा वेढा.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३ मारला गेला, व त्याच्या हाताखालचे सैन्य सैरावैरा पळू लागले. हे पाहून बाबू साहेबांस असे वाटले की, आतां हे सर्व लोक खास मारले जातात. मग बाबूने, त्या पलटणीतील सर्व हवलदार व सुभेदार वगैरे प्रमुख लोकांस जवळ बोलाविलें, त्यांस धीर दिला, व आपण जनरलचा पोशाख करून व पळणाऱ्या सैन्यास मागें फिरवून, जाट लोकांच्या एका तुकडीवर हल्ला करून तिचा पराभव केला ! युद्ध संपल्यावर, लष्करी कायद्याप्रमाणे बाबूवर मोठा आरोप येऊन, लष्करी न्यायसभेपुढे त्याची चौकशी सुरू झाली. कारण, वरिष्ठाच्या आज्ञेशिवाय जनरलचा पोशाक करून लढणे, हा लष्करी कायद्याप्रमाणे मोठा अपराध समजला जातो. शेवटी, चौकशी पुरी होऊन बाबूवर आरोप शाबीत झाला व त्याबद्दल त्यास ५०० रुपये दंड द्यावा लागला. पुढे, युद्धांत, चांगल्या प्रकारे कोण कोण लढले व जयप्राप्ति कोणाकोणास झाली, वगैरे चौकशी सुरू झाली, व तीत जाटांच्या एका तुकडीवर जय मिळविल्याबद्दल बाबू कालीचरण याचें नांव पुढे येऊन, लॉर्ड लेक साहेबाने त्याच्या शौर्याबद्दल व प्रसंगावधानाबद्दल त्यास ३०,००० रुपये बक्षीस दिले ! तेव्हांपासून इंग्रजी लष्करांतील लोक, 'जनरल कालीचरण घोस' या नांवाने त्यास हाक मारूं लागले! एतद्देशीय लोकांमध्ये सेनापतीचे काम करण्याचे सामर्थ्य अद्याप कायम आहे, ह्याचे हे एक ठळक उदाहरण आहे. प्रकरण नववे. महाराणा रणजितसिंह यास चार पुत्र होते. पहिला रणधीरसिंह, दुसरा बलदेवसिंह, तिसरा लक्ष्मणसिंह, व चौथा पार्थसिंह.