पान:भरतपुरचा वेढा.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ तह झाल्यावर इंग्रजी सैन्य आपली छावणी सोडून निघून गेले. लॉर्ड लेक साहेबाने आपल्या पराभवाची, खाली दिलेली कारणे प्रसिद्ध केली. - 'भरतपुर शहराची तटबंदी किती मजबूद आहे, हे आमांस मुळीच ठाऊक नव्हते; भरतपुरच्या आसपासचा प्रदेश उच्च व नीच असा असल्यामुळे तेथे युद्ध करण्याचे काम फार बिकट आहे, व इंग्रजी सैन्याबरोबर एकही चांगला इंजिनीयर नव्हता.' लेक साहेबाच्या पराभवाची कोणतीही कारणे असोत, परंतु त्यामुळे हिंदुस्थानांतील इंग्रजांच्या इभ्रतीस तेव्हां मोठाच धक्का बसला. हिंदुस्थानांत, आपल्या राज्याचा प्रसार करण्याच्या कामी, इंग्रजांस असें अपयश कधीच प्राप्त झालेले नाही. हिंदुस्थानांतील अनेक राजांनी हा कालपावेतों इंग्रजांशी पुष्कळ लढाया केल्या, परंतु भरतपुरच्या महाराण्याप्रमाणे, त्यांतील एकासही विजय प्राप्त झाला नाही. या विजयामुळे महाराणा रणजितसिंह याचे महत्त्व इतके वाढले की, हा कोणी देवी पुरुष आहे, असे लोक समजू लागले. या भरतपुर युद्धाच्या इतिहासांत, एका बंगाली बाबूची गोष्ट फार प्रसिद्ध व मनोरंजक आहे. या बाबूचें नांव कालीचरण घोस हे असून, तो, त्या वेळी, लॉर्ड लेक साहेबाच्या कमिसारियट खात्यांत काम करीत असे. त्या वेळी, आतांच्या सारखी शांतता नसून, देशांत जिकडे तिकडे, लढाया व दंगे चालू असत, व इंग्रजी सैन्यास तर शत्रूशी सामना करण्याचे प्रसंग वरचेवर येत असत. असे अनेक प्रसंग पाहून व स्वतः बुद्धिमान् असल्यामुळे बाबू कालीचरण घोस कधी कधी समरांगणावर जाऊन आपले शौर्य दाखवीत असे. भरतपुरचे युद्ध चालू असतां, एकदां असे झाले की, बाबूच्या पलटणीचा जनरल (सेनापति ) जाटांकडून