पान:भरतपुरचा वेढा.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ लागले ! व त्यांची प्रेतें वरून खाली पडू लागल्यामुळे त्यांच्या धक्कयाने वर चढणारे दुसरे अनेक शिपाई, धडाधड खाली पडून तेथल्या तेथें गतप्राण होऊ लागले ! याच वेळी दुसऱ्या एका चौथऱ्यावरून, जाटांनी इंग्रजांवर गोळ्यांचा भडिमार चालविला होता. आपले अनेक शिपाई मेले आहेत व मरत आहेत असे पाहून इंग्रजी सैन्याची पांचांवर धारण बसली. अशा निरुत्साह प्रसंगी, टेम्पलूटन् साहेबाने मोठ्या नेटाने पुढे चाल करितांच, पुनः इंग्रजी सैन्यांत आवेश उत्पन्न झाला. टेम्पल्टन् साहेब चौथऱ्याच्या अगदी शिखरावर चढून गेला होता व तेथे त्याने इंग्रजांचे निशाणही रोंविलें ! परंतु या त्याच्या साहसाचा परिणाम चांगला झाला नाही. त्यास जाटांच्या गोळीबारास बळी पडावे लागलें, व त्याचा साथीदार मेजर मॅनियन् हाही या प्रसंगी आपल्या प्राणास मुकला. अशा प्रकारचा भयंकर मुकाबला व मृत्यूची सजीव मूर्ति अवलोकन करूनही इंग्रजी सैन्याने दुर्ग आक्रमण करण्याचा प्रयत्न सोडून दिला नाही. जेथे ज्या इंग्रेजी शिपायाला कांहीं आधार मिळाला, तेथून वर चढण्याचा आपला उद्योग त्याने चालू ठेविला होता. परंतु जाटांची दृष्टि चुकवून तटावर चढून जाण्यांत एकासही यशःप्राप्ति झाली नाही. इंग्रज शिपाई वर चढतांना जाटांनी पाहिला की, त्याला ठार मारून तटाखाली लोटून दिलाच, असा प्रकार चालला होता. लांकडांचे मोठमोठे ओंडे तटावरून खाली फेंकण्याचा तर जाटांनी सपाटाच चालविला होता. शिवाय त्यांचा गोळीबारही चालूच होता. तथापि असल्या प्रयत्नांनी होणाऱ्या इंग्रजी सैन्याच्या विध्वंसाने संतुष्ट न होतां, जाटांनी आणखी एक भयंकर युक्ति योजून ती लागलीच अमलांत आणिली. मोठमोठ्या कढया तेलाने भरून विस्तवावर ठेविल्या, व