पान:भरतपुरचा वेढा.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाध्यक्ष लेफ्टनंट डन् याने आपल्या पिछाडीच्या सैन्यास एकदम पुढे सरण्याचा हुकूम दिला. हा हुकूम मान्य करण्यास तें सैन्यही पहिल्याने कांकू करूं लागले, परंतु डन् साहेबाच्या उत्तेजक शब्दांनी थोडासा धीर आल्यावर, त्या सैन्यांतील शिपाई जोराने पुढे सरले, व मोठ्या धैर्यानें खंदक ओलांडून अलीकडे आले. हे लोक तटाच्या तुटलेल्या भागांत शिरून तटाच्या आंत शिरण्याचा प्रयत्न करूं लागले, व कांहीं शिपाई तटावरही चढले, परंतु त्यांस साहाय्य करावयास दुसरे शिपाई तयार नसल्यामुळे, आंत उतरण्याचे धैर्य त्यांस होईना. सेनापतीनें वारंवार आग्रह केल्यावर व धमकाविल्यावर, फक्त १४ शिपाई, या तटावर चढलेल्या शिपायांस साहाय्य करावयास पुढे झाले. इतर शिपाई भयाने इतके गांगरून गेले होते की, केवळ दगडाच्या पुतळ्यांप्रमाणे त्यांची हालचालही बंद झाली होती ! वर लिहिलेले १४ शिपाई तटाजवळ जाऊन पोहोंचले तोंच, जाटांनी, आंत भरून ठेविलेल्या दारूच्या कोठारास अकस्मात् आग लाविली; त्यामुळे इतका भयंकर स्फोट झाला की, डन् साहेबास आपल्या सैन्यासह प्राणरक्षणार्थ मागे पाय काढावा लागला ! “या प्रसंगाइतका भयंकर प्रसंग इंग्रजी सैन्यावर कधीही गुजरला नाही,' असें एक इंग्रज इतिहासकार लिहितो. या प्रसंगी इंग्रजांचे २५ गोरे कामदार (ऑफिसर्स ), ४९ गोरे शिपाई व ११३ काळे शिपाई ठार झाले, व १७६ गोरे व ५५६ काळे शिपाई जखमी झाले. या लढाईतही, जाटांचा जय झाला. प्रकरण सातवें. मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे जाटांनी इंग्रजी सैन्याचा भर० ३