पान:भरतपुरचा वेढा.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ गोळ्यांनी तटाचा जो भाग तुटून पडला ह्मणून पूर्वी लिहिले आहे, त्या भागांतून आत शिरण्याचा या योद्धयाने प्रयत्न चालविला होता, परंतु त्याचे शिपाई या साहसास प्रवृत्त होण्यास कांकू करूं लागले. साहेबाने मिठा भाषण करून आपल्या लोकांस उत्तेजन देण्याची शिकस्त केली, परंतु तिचा कांहींच उपयोग झाला नाही. कारण खिंडारांतून आंत जावयाचे ह्मणजे प्रत्यक्ष मृत्युमुखांतच शिरावयाचे, असा सर्व शिपायांचा समज होऊन चुकला होता. तटावरून तोफांच्या गोळ्यांचा जाटांनी असा भयंकर वर्षाव सुरू केला होता की, प्रत्यक्ष अग्निनारायण आपल्या सहस्र जिव्हांनी इंग्रजी सैन्याचा स्वाहाकार करूं पहात आहे की काय, असे प्रेक्षकांस वाटले ! इकडे, पूर्वीच्या सुरुंगांतून काही इंग्रजी शिपायांनी तटाचे आंत शिरण्याची अगदी लगट केली होती, परंतु जाटांनी त्यांस चारी बाजूंनी वेढून टाकिल्यामुळे, धारातीर्थी पतन पावून स्वर्गलोक जवळ करण्यापलीकडे त्यांस कांहीं अधिक करितां आले नाही. हे भयंकर वर्तमान मेजर डन् यास समजले, तेव्हां त्याने त्या लोकांस साहाय्य करण्याकरितां जाण्याचा आपल्या सैन्यास एकदम हकूम केला, परंतु हा हकूम ऐकतो कोण ? जाटांच्या भयंकर माऱ्याने, इंग्रजी शिपाई इतके भीतिग्रस्त होऊन गेले होते की, ते एक पाऊलही पुढे टाकीनात ! सेनापतीने त्यांस बक्षिसाची लालूच दाखविली, त्यांची स्तुति केली, त्यांस शिव्या दिल्या व शेवटी आपली आज्ञा उलंघन केल्याबद्दल भयंकर शिक्षा देण्याचा त्यांस धाकही दाखविला, परंतु इंग्रजी सैन्यावर त्याचा बिलकूल परिणाम झाला नाही किंवा एकाही शिपायाने तिकडे लक्ष दिले नाहीं ! आपल्या अघाडीचे सैन्य आपले ऐकत नाही असे पाहून, दृढप्रतिज्ञ स