पान:भरतपुरचा वेढा.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ खोदण्याचे सामान, ही हिसकून घेतली व अशा प्रकारे, इंग्रजांच्या सुरुंग खणण्याच्या उद्योगास, त्यांनी धाब्यावर बसविलें ! या सुरुंगांत शिरलेल्या जाटांची व इंग्रजांची, या प्रसंगी, जोराची चकमक उडाली, व त्यांत जाटांच्या तीक्ष्ण तलवारींस व भाल्यांस अनेक इंग्रजी शिपाई, एकसमयावच्छेदेंकरून, बळी पडले. शेवटी, बरेच मोठे इंग्रजी सैन्य, आपणास घेरण्यासाठी तटाकडे येत आहे असे पाहतांच जाट शिपाई तटाचे आंत पळून गेले ! ___ पहिल्या व दुसऱ्या युद्धाच्या वेळी, इंग्रजांनी आपल्या तोफांच्या माऱ्याने तटाचा जो भाग पाडून टाकिला होता, तो ह्या तिसऱ्या युद्धापर्यंतच्या अवकाशांत, जाटांनी पूर्ववत् बांधून काढिला होता, परंतु या खेपेस इंग्रजी तोफांच्या गोळ्यांनी पुनः तटाचा काही भाग तोडून टाकिला व त्या खिंडारांतून तटाचे आंत शिरण्याचा इंग्रजी सैन्याने प्रयत्न चालविला. लेफ्टनंट डन् या इंग्रजी योद्ध्याने, बरेच शिपाई आपल्या बरोबर घेऊन खिंडाराकडे चाल केली. क्याप्टन् ग्रांट यास, शहराबाहेरील जाट सैन्यावर तुटून पडण्याचा इंग्रज सेनापतीचा हुकूम झाल्यावरून, तोही आपलें सैन्य घेऊन तिकडे निघाला. टेलर साहेबानें, एका मोठ्या सैन्यासह, तटाच्या वीर नारायण नामक दरवाजाकडे चाल केली. या तीन इंग्रज योद्धयांपैकी क्याप्टन् ग्यांट याने, शहराबाहेरील थोड्याशा जाट शिपायांवर हल्ला करून त्यांचा पराभव केला व टेलर साहेबांचा व जाटांचा वीर नारायण दरवाजापाशी, एक लहानसा सामना होऊन, त्यांत साहेब बहादुरांस अपजय प्राप्त होऊन मागे फिरावे लागले. इंग्रजी सैन्यांतील तिसरा योद्धा ले० डन् याची व जाटांची या प्रसंगी जी लढाई झाली, तिचा वृत्तांत मात्र इतिहासांत चिरस्मरणीय होऊन राहिला आहे. प्रचंड इंग्रजी तोफांच्या भयंकर