पान:भरतपुरचा वेढा.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रोमन योद्धा ज्युलियस सीझर याच्या वेळी, इंग्लंडांत, गायीच्या कातड्याच्या ज्या एक प्रकारच्या नावांचा उपयोग करण्यांत येत असे, त्याच प्रकारच्या नावा इंग्रजी सैन्याने या वेळी बांधिल्या. त्यांतील कित्येक नावा ४० फूट लांब व १६ फूट रुंद, एवढ्या मोठ्या होत्या. या वेळी, यशवंतराव होळकर व अमीरखान पठाण, हे इंग्रजी सैन्याशी लढण्याच्या कामी फार उपयोगी पडत असल्यामुळे, महाराज रणजितसिंह त्यांजवर फार प्रसन्न झाला होता. परंतु त्या दोघांच्या लष्करासाठी बहुत पैसा खर्च करावा लागत असल्यामुळे, रणजितसिंहाचा खजिना बहुतेक रिकामा झाला होता. अशा वेळी येथे राहण्यांत काही फायदा नाही, असा विचार करून, अमीरखान आपल्या सैन्यासह रोहिलखंडांत निघून गेला! ___ इकडे, इंग्रजी, सैन्य आपला तळ हालवून तटाच्या उत्तर व पूर्व या दिशांकडे येऊन जमू लागले व त्यानें, खंदकाच्या अगदी जवळ, मोर्चे बांधून तटावर तोफा रोखिल्या. ता० ११ फेब्रुवारी रोजी, या तोफांचा मारा इंग्रजी सैन्याने किल्ल्याच्या तटावर सुरू केला. आणखीही एक नवी युक्ति योजण्यांत आली होती. खंदकापासून जमिनींतून सुरुंग खणून, तटाखालून गुप्तपणाने तटाचे आंत जाण्याचा प्रयत्न, इंग्रजी सैन्याने चालविला, व त्याकरितां एक मोठा सुरुंगही तयार करण्यांत आला; परंतु जाट लोकांस हे इंग्रजांचे गुप्त कृत्य तेव्हांच कळून आलें व ता० २० फेब्रुवारी रोजी, रात्रीच्या वेळी, काळोखांतून कांहीं जाट शिपाई, त्या सुरुंगांत शिरले. हे लोक इतक्या चलाखीने आंत शिरले की, हुशार इंग्रजांस, त्यांच्या प्रवेशाचा बिलकूल संशय आला नाहीं ! रात्रभर त्या सुरुंगांत छपून राहून उजाडल्यावर, या लोकांनी सुरुंग खणणाऱ्या इंग्रजी शिपायांची शस्त्रास्त्रे व