पान:भरतपुरचा वेढा.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१ होऊ लागली. इतक्यांत, मुंबईहून मेजर जनरल जोन्स हा प्रसिद्ध इंग्रज सेनापति, आपल्या सैन्यासह, लॉर्ड लेक यास येऊन मिळाला. हे नवें सैन्य आपल्या मदतीस आलेले पाहून, इंग्रजी सैन्य दुप्पट वीरश्रीप्रेरित होऊन सिंहनाद करूं लागले ! यानंतर, ता० २४ फेब्रुवारी रोजी, लॉर्ड लेक साहेबानें, इंग्रजी सैन्यास भरतपुरावर चाल करण्याचा हुकूम दिला. यापूर्वी इंग्रजांचा पराभव जाटांकडून झाल्यापासून, इंग्रजी सैन्यांत कांहीं किरकोळ गोष्टी घडून आल्या होत्या, त्या अशाः-इतके दिवस, एकसारखें युद्ध करावे लागल्यामुळे, इंग्रजी सैन्याची रसद अगदी संपुष्टांत आली होती, व त्यामुळे मथुरा प्रांतांतून अन्नसामुग्री मागविणे इंग्रजांस भाग पडले. ही सामुग्री, १२,००० बैलांवर लादून भरतपुराकडे चालविली असतां, भरतपुरचा राणा रणजितसिंह याने, रोहिलखंडाचा मुसलमान सरदार अमीरखान यास, ती लुटण्याकरितां पाठवून दिलें. ४,००० सैन्य व ४ तोफा यांसह अमीरखानानें, भरतपुरापासून २० मैलांवर, रसद घेऊन येणाऱ्या इंग्रजी सैन्यावर, एकदम हल्ला केला, परंतु त्याचा पराभव होऊन इंग्रजी सैन्याने त्याच्या सैन्याची शस्त्रास्त्रे हिरकून घेतलीं, व स्वतः अमीरखानास वेष पालटून पळून जावे लागलें! ता० २८ जानेवारी रोजी, इंग्रजी सैन्य, ५,००० बैलांवर अन्नसामुग्री व शस्त्रे लादून आग्र्याहून भरतपुराकडे येत असतां, रणजितसिंह, यशवंतराव होळकर आणि अमीरखान या तिघांनी तिजवर एकदम हल्ला केला, परंतु इंग्रजांपुढे त्यांचे काही चालले नाहीं ! ता० ६ फेब्रुवारी रोजी, इंग्रजी सैन्याने आपले पहिले स्थान सोडून तटाच्या दक्षिणेच्या बाजूस, आपला तळ दिला व खंदक तरून जाण्यासाठी नावा बांधण्याचे काम सुरू केले. प्रसिद्ध