पान:भरतपुरचा वेढा.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण साहावें. भरतपुरचा राजा रणजितसिंह याच्या आत्मरक्षणप्रयत्नाची, जाट वीरांच्या समरकौशल्याची व इंग्रजांच्या साहसोद्योगादि गुणांची धन्य असो ! क्रमशः, भरतपूर दुर्गाचे आक्रमण करण्यांत, इंग्रज दोन वेळ भग्नमनोरथ झाले, व त्यांचे शेकडो शिपाई मेले, व जखमी झाले, तथापि त्यांनी आपल्या साहसबुद्धीचा त्याग केला नाही किंवा दुर्ग आक्रमण करण्याच्या इच्छेचाही त्याग केला नाही! दोन वेळ पराभव पावल्यामुळे निराश झालेल्या इंग्रजी सैन्यास हुरूप आणण्यासाठी सेनापति लॉर्ड लेक साहेबानें एक जाहिरनामा प्रसिद्ध केला. त्याचा आशय असाः ज्या लोकांनी तटाच्या आंत प्रवेश करण्याच्या कामी, काल खरी वीरता प्रगट केली त्या लोकांना, मी, मनापासून शेंकडों धन्यवाद देतो. तसेंच, जे वीर, कालच्या युद्धांत, धारातीर्थी पतन पावले व जे घायाळ झाले आहेत, त्यांच्यासाठी माझें अंतःकरण तीळतीळ तुटत आहे. परंतु, जरी दोन वेळ, आह्मी अशा अपमानकारक रीतीने पराभव पावलो आहों, जरी दोन वेळ, आमांस, आमच्या शेकडो शूर शिपायांच्या मृत्यूची भयंकर हानि सोसावी लागली आहे, तरीही आह्मांस फिरून प्रयत्न करून पाहणे भाग आहे. झालेल्या पराभवांस भिऊन व हताश होऊन, माघार घेतल्यास, आजपर्यंत मिळविलेल्या कीर्तीस आह्मीं काळिमा आणिला, असें होईल; इकडे आमच्या युरोपियन वीरांनी लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक देशी शिपायास, दोनशे रुपये बक्षीस देण्यात येणार आहेत.' __ हा जाहीरनामा प्रसिद्ध होतांच, पुनः इंग्रजी सैन्यांत उत्साह उत्पन्न झाला, व पुनः भरतपुरच्या तटावर हल्ला करण्याची तयारी