पान:भरतपुरचा वेढा.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

येतांच, त्या मतलबी लोकांनी, तटाचा जो भाग पडला होता, त्याची सूक्ष्म दृष्टीने पाहणी केली, व भरपूर माहिती मिळतांच, आपल्या घोड्यांस टांच मारून, विजेच्या वेगाने ते एकदम आपल्या गोटाकडे पळत सुटले ! हे त्यांचे कपटकृत्य उघडकीस येतांच, जाटांनी त्यांजवर आपल्या बंदुका झाडिल्या, परंतु त्यांतून बचावून तो हवलदार व त्याचे दोन्ही साथीदार सुखरूपपणे इंग्रजी सैन्यांत जाऊन पोहोंचले. हवलदाराने आपल्या सेनापतीस अशी माहिती दिली की, तटाबाहेरील खंदक फार खोल नसून तो उतरून पलीकडे जाणे फार कठीण आहे, असे नाही. तसेंच, रस्ताही साफ असून तटाची उंचीही फार आहे असें नाही. ही माहिती मिळतांच इंग्रजी सैन्यांत, एकच आनंदीआनंद होऊन गेला. सेनापतीने त्या तिन्ही बातमीदारांस प्रत्येकी पांचशे रुपये बक्षीस दिले व पुनः तटावर चालून जाण्याची तयारी चालविली. ता० २१ जानेवारी रोजी, पूर्वीच्या युद्धांत जखमी झालेला इंग्रज योद्धा कप्तान लिंड्से याने आपल्या ४७० शिपायांसह, पुनः भरतपूरच्या तटावर चाल केली. त्यास मदत करण्याकरितां आणखी बरेंच सैन्य निघाले. हवलदार व त्याचे साथीदार यांच्या सांगण्यावरून, खंदक ओलांडण्यास उपयोगी पडेल अशी एक शिडी तयार करून ती कप्तान लिंड्से याने आपल्याबरोबर घेतली होती. तटाजवळ जाऊन पोहोचल्यावर, हवलदाराने ज्या ठिकाणाची माहिती दिली होती, तें ठिकाण जाटांनी चौपट मजबूद केलेले पाहून इंग्रजी सैन्यास मोठे आश्चर्य वाटले. कप्तानाने बरोबर आणिलेल्या शिडीचा तर काहींच उपयोग झाला नाही! कारण, खंदकांत अधिक पाणी येऊन तो दुस्तर व्हावा ह्मणून जाटांनी एक मोठा बांध घालून खंदकाची