पान:भरतपुरचा वेढा.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धैर्य ह्या वेळी झाले नाही तर त्यांत कांहीं मोठंसें आश्चर्य नाही. वरें, तशा प्रकारची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणे, हे तरी सामान्य प्रतीचे काम होते असे नाही. या कामी कदाचित् प्राणसंकटही प्राप्त होण्याचा संभव होता व त्यामुळे असले साहस करण्यास कोणीही प्रवृत्त होईना. शेवटी, इंग्रजांच्या देशी सैन्यांतील एका साहसी हवलदारानें, सर्व माहिती मिळविण्याचा विडा उचलला, व त्यास साहाय्य करण्यास दोन देशी शिपाई तयार होऊन, तेही त्याजबरोबर तटाकडे जावयास निघाले. या लोकांनी कशी चमत्कारिक युक्ति लढविली पहा. त्यांनी, हुबेहुब जाट लोकांसारखा पोषाख केला व घोड्यावर बसून भरतपुरच्या तटाकडे ते पळत सुटले, व इंग्रजी फौजेंतील कांहीं स्वार, त्यांस पकडण्याकरितां ह्मणून त्यांच्या मागे लागले ! या स्वारांनी त्यांच्यावर आपल्या बंदुका झाडण्याचाही सपाटा चालविला होता, परंतु त्यांत गोळ्या मात्र घातल्या नव्हत्या ! हा प्रकार पाहून किल्ल्यांतील जाट लोकांस असे वाटले की, हे तीन असामी इंग्रजी सैन्यांतून फुटून आपल्या पक्षास मिळावयास येत आहेत, व त्यांचा पाठलाग करण्याकरितां इंग्रजी स्वार त्यांच्या मागे लागले आहेत ! हा जाटांचा समज दृढ व्हावा ह्मणून इकडे त्या कावेबाज इंग्रजी हवलदाराच्या साथीदारांनी तटाजवळ येतांच, घोड्यांवरून खाली पडल्याचा बहाणा केला, व हवलदार जाटांस उद्देशून मोठ्याने ओरडला, 'भाईहो ! तटाच्या आंत येण्याचा मार्ग कोठे आहे, तो आमांस लवकर दाखवून आमचे जीव वांचवा; नाहीतर या बदमाष इंग्रजी स्वारांच्या तलवारींस आह्मी खचीत बळी पडतों !' हे त्यांचे मानभावीपणाचे भाषण ऐकून, भोळ्या बिचाऱ्या जाटांस त्यांचा बिलकूल संशय न येता, त्यांनी त्यांस तटाचे द्वार दाखवून निःशंकपणे आंत येऊ दिलें! आंत