पान:भरतपुरचा वेढा.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पूर्वजांच्या धवल कीतीस काळिमा लावण्याची व त्यांनी घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करण्याची वाताही नको.' रणजितसिंहाचे भाषण पुरे होतें न होते तोंच, 'नको, नको, असली अशुभ वार्ताही आमच्या कानी पडावयास नको,' असा विराट् ध्वनि, जाटसेनासमुद्रांतून निघून, त्याचा प्रतिध्वनि भरतपुरच्या दुर्गात दुमदुमू लागला ! ही जणूं काय आकाशवाणीच झाली, असे समजून राणा रणजितासिंह दुर्गरक्षणाची व्यवस्था उत्साहपुर्वक करूं लागला. इतक्यांत, रोहिलखंडांतील मुसलमान सरदार अमीरखान हाही आपल्या सैन्यासह, भरतपुरकरांस येऊन मिळाला. इकडे इंग्रजांनी आपल्या प्रचंड तोफांचा मारा, ता० २१ जानेवारीपर्यंत, एकसारखा चालू ठेविला होता. परंतु भरतपूरकरांनी, त्यांच्या एकाही तोफेस जबाब दिला नाही, किंवा बंदुकीचा एकही आवाज काढिला नाही. तटाचे आंत सशस्त्र उभे राहून इंग्रजी सैन्याच्या आगमनाची ते प्रतीक्षा करीत होते ! ही जाटांची स्तब्धता पाहून, इंग्रज पहिल्याने अगदी चकित होऊन गेले, परंतु मागाहून, अशा प्रकारे स्तब्ध राहण्यांत जाटांचा कांहीं तरी मतलब असला पाहिजे, असा त्यांस संशय आल्यामुळे, आपलें सैन्य तटाजवळ नेण्याचे त्यांस धैर्य होईना. ता० २१ जानेवारी रोजी, तटाचा काही भाग तोफांच्या माऱ्याने तुटून पडला असतांही, तेथपर्यंतचा मार्ग आक्रमण करणे इंग्रजांस अशक्य वाटू लागले, कारण खंदकाच्या बाहेरील व तटाच्या आंतील ठिकाणांची पुरी माहिती नसल्यामुळे, ता. ९ जानेवारी रोजी, त्यांस जो भयंकर अपजय प्राप्त झाला होता, त्याची अद्याप त्यांस विस्मृति पडली नव्हती. तेव्हां त्या ठिकाणांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय, एकदम चाल करून जाण्याचे त्यांस