पान:भरतपुरचा वेढा.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जो भाग पडला होता, तो पुनः पूर्ववत् बांधून काढण्याचे काम सुरू केले. हे काम शेवटास जाऊं नये ह्मणून इंग्रजांनी त्यांजवर आपल्या तोफा सोडण्याचा सपाटा चालविला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जाटांनी इंग्रजी तोफखान्याच्या अग्निवृष्टीची बिलकूल पर्वा न करितां, तटाचें खिंडार पूर्ववत् बांधून काढिले. इकडे इंग्रजांनी ती जागा सोडून देऊन, दुसरीकडे जवळच तटास एक लहानसें भोंक पडलें होतें, तिकडे आपल्या तोफांचे मोर्चे फिरविले, व ता० १६ जानेवारी रोजी, एकदम २७ तोफांचा भयंकर मारा तटावर चालू केला. याचा परिणाम असा झाला की, दुसऱ्या दिवशी तटास बरेच मोठे खिंडार पडलेले इंग्रज सेनापतींच्या दृष्टीस पडले. हे नवें खिंडारही पूर्ववत् बांधण्याचे काम जाटांनी सुरू केले, परंतु इंग्रजी तोफांच्या माऱ्यापुढे त्यांच्याने बिलकूल टिकाव धरवेना, व तें खिंडार अधिकच मोठे होत चाललें. इकडे जाटांचा राजा रणजितसिंह याचा चुलता रणधीरसिंह हा ता० ९ जानेवारी रोजी, इंग्रजांचा ज्या ठिकाणी मोड झाला होता, त्या ठिकाणाची बारकाईने पाहणी करीत असतां, इंग्रजी तोफेचा एक गोळा लागून मरण पावला ! हे इंग्रजांचे कृत्य अवलोकन करून, राजा रणजितसिंह अगदी आश्चर्यचकित होऊन गेला व आपल्या चुलत्याच्या मृत्यूनें आपलें सैन्य भीतिग्रस्त न व्हावे ह्मणून आपल्या सर्व लोकांस उद्देशून ह्मणाला, 'वीर हो ! माझी तर अशी प्रतिज्ञा आहे की, युद्धांत मरेन तरी एक, किंवा दुर्गाचे संरक्षण तरी करीन एक; याशिवाय दुसऱ्या मार्गाचे अवलंबन कदापि करणार नाही. युद्ध करीत असतां मृत्यु पावणे हे जाटांचे कर्तव्यकर्मच होय. आमच्या पूज्य पूर्वजांनी तेच केलें, व आमांसही आतां तेच केले पाहिजे. युद्धांत मेलों तरी बेहत्तर, परंतु इंग्रजांस शरण जाऊन आपल्या