पान:भरतपुरचा वेढा.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पावतांच इंग्रजी सैन्य सैरावैरा पळू लागले. पळतेवेळीसुद्धां, जाटांच्या बंदुकांस कैक शिपाई बळी पडले! कित्येक शिपाई खंदकांत पडून बुडून मेले! थॉर्न साहेब लिहितो, 'या लढाईत, ४० गोरे व ४२ काळे शिपाई मारले गेले, व २६० गोरे व १२५ काळे शिपाई जखमी झाले ! इंग्रजांचा पूर्ण पराभव झाला व जाट विजयी झाले. या युद्धांत कर्नल मेटलेन्ड, क्यापटन् वॉलेस, लेफ्टनंट क्लब, परसिव्हल व एन्साईन वॉटर हौस हे पांच इंग्रज योद्धे (ऑफिसर्स) मरण पावले, व मेजर क्यांबेल, क्याप्टन् हेसमन् , लेफ्टनंट वाईन टूली, म्याकल्क्लान्, म्याथ्यूसन् , एन्साहेन, हार्टकील, क्याप्टन् वेबनर, ले० कासग्रोव, सॉटन्यांग, क्रेसवेल, उड्, ह्यामिल्टन् , ब्राऊन, लेटर, कर्कटर्नबुल, मेजर ग्रेगरी, क्याप्टन् ओडोनेल, फ्रेवर, शार्प, बेकर व फ्लेचर हे २४ योद्धे जखमी झाले. एकंदरीत या नऊ दिवसांच्या युद्धात जाट लोकांनी मोठा वर्णनीय पराक्रम केला ह्मणावयाचा! प्रकरण पांचवें. मागील प्रकरणांत वर्णिल्याप्रमाणे खडतर प्रसंग प्राप्त झाला असतांही, इंग्रजी सैन्याने आपले धैर्य बिलकूल खचू न देतां, भरतपुरच्या तटावर दुसरा दुप्पट जोराचा हल्ला करण्याची तयारी चालविली. ही तयारी ता० १० जानेवारीपासून १५ जानेवारीपर्यंत चालली होती, व तटावर तोफा चालविण्याची व्यवस्था पूर्वीच्या व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली केली होती. इकडे जाट लोकही स्वस्थ बसले नव्हते. ता० ९ जानेवारीच्या युद्धांत विजयश्री मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी, त्यांनी, तटाचा