पान:भरतपुरचा वेढा.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ जाट सैन्याचा पराभव केला, व त्याच्या तोफा हस्तगत करून त्या अगदी निरुपयोगी करून टाकिल्या. नंतर, मेटलेन्ड यास जाऊन मिळण्याकरितां त्याने पुढे कूच केले. त्याचप्रमाणे कर्नल रिपन यानेही शत्रुसैन्याची फळी फोडून दुर्गद्वारांतून आंत जाण्याचा प्रयत्न चालविला होता; परंतु तटाच्या आंत दुसरा मोठा खंदक असल्यामुळे त्यास माघार घ्यावी लागली. हळूहळू रात्र होत चालली, व काळोखामुळे इंग्रज सेनापतीस कोणत्याही प्रकारचा निर्णय करितां येईना. जागा काही ठिकाणी उच्च व काही ठिकाणी सखल असल्यामुळे चालतांना, सैन्यांतील शिपाई अडखळून पडू लागले. शिवाय तटावरून, जाट लोकांच्या तोफांचा मारा एकसारखा चालू होता. इतक्याही अडचणींस मागें सारून, इंग्रजी सैन्यांतील कांहीं साहसी शिपाई खिंडारांतून आंत जाण्याचा प्रयत्न करीत असतां, जाटांनी आपल्या तीक्ष्ण खड्गांनी त्यांवर प्रहार करून त्यांस ठार मारिलें. या चकमकींत, स्वीटनेम व क्रेसवेल या नांवांचे दोन इंग्रज योद्धेही घायाळ झाले. या वेळी, हा प्राणहारक प्रयत्न सोडून देऊन मागे फिरावें हे बरें, असें इंग्रजी सैन्याने जनरल मेटलेन्ड यास सांगितले, परंतु तो अद्याप निराश झालेला नसल्यामुळे ह्मणा किंवा त्याच्या गळ्यास यमपाश पडले होते यामुळे ह्मणा, त्यानें तें नाकारिलें, व स्वतः तटावर चढण्याचा प्रयत्न चालविला! परंतु तो तटाच्या माथ्यावर चढला न चढला इतक्यांत, जाटांकडील एका शिपायाने आपल्या बंदुकीची गोळी सोडून त्यास तत्काळ ठार केलें, व त्याचे प्रेत तटावरून खाली पडतांच, इंग्रजी सैन्यांत एकच हाहाकार उडाला. तेव्हां तर अगदीच निराशा झाली. सेनाध्यक्ष धारातीर्थी पतन भर० २