पान:भरतपुरचा वेढा.pdf/17

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काही लोक खंदक ओलांडून तटास जाऊन भिडले. या वेळी, जाटांच्या तीन तोफांचा एकसारखा वर्षाव चालू असतां, लेफ्टनंट मॉनसर या नांवाचा एक तरुण इंग्रज योद्धा जिवावर उदार होऊन, आपल्या वीस साथीदारांसह, तटास जेथें खिंडार पडले होते तेथे जाऊन पोहोचला, व तटावर चढण्याचा प्रयत्न करूं लागला. हे त्याचें साहस अवलोकन करून जाट लोक अगदी चकित होऊन गेले, व त्याजवर व त्याच्या साथीदारांवर त्यांनी गोळ्यांचा वर्षाव सुरू केला. तथापि वीर्यशाली पुरुष प्रत्यक्ष प्राण जाण्याचा प्रसंग आला तरीही समरभूमीपासून परावृत्त होत नाही. जाटांच्या गोळीबाराची बिलकूल पर्वा न करितां मॉनसर साहेबांच्या साथीदारांपैकी चार असामी तटावर चढले. इतक्यांत एका जाट शिपायाने त्यांपैकी एकास लाथ मारून खालीं फेंकून दिले व इतरांचीही तीच अवस्था केली ! तटाबाहेरील लोकांसही दरवाजा धरून बसणे कठीण पडूं लागले, एवढेच नव्हे, तर जाटांच्या बंदुकांच्या गोळ्यांचा वर्षाव व त्यांच्या एकप्रकारच्या लोहपात्रांतून तप्त होऊन बाहेर पडणारी तीक्ष्ण शस्त्रे, यांजपुढे टिकाव न लागल्यामुळे, इंग्रजी सैन्यास शेवटी तटाचा दरवाजा सोडून मागे हटावे लागलें. ____ या प्रकारे पराभूत झाल्यावर, आपला कांहींच उपाय चालत नाहीं असें पाहून, मॉनसर साहेब आपल्या साथीदारांस त्या खिंडारापाशी ठेवून, मेटलेन्ड साहेबाच्या शोधास निघाला. बऱ्याच वेळाने त्या दोघांची गांठ पडली व मॉनसरसाहेब, मेटलेन्ड व त्याचे सैन्य यांसहवर्तमान आपल्या साथीदारांस येऊन मिळाला. खिंडारापाशी, भरपूर सैन्य जमलें, असें पाहून सेनापति मेटलेन्ड याने आपल्या सैन्यास तटावर चढण्याचा हुकूम केला. इकडे हॉक्स साहेबाने तटाबाहेरील