पान:भरतपुरचा वेढा.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कार म्यालिसन याने, या वेळी भरतपुरांत, ८,००० पेक्षा अधिक सन्य नव्हते. असे लिहिले आहे, यावरून थॉर्नसाहेबांचा आंकडा बराच संशयास्पद असावा हे उघड होते. कोठे ८०,००० आणि कोठे ८,००० ! हा थॉर्नसाहेबांचा केवळ हस्तदोष असेल तर कांही मोठेसें आश्चर्य नाही. असो. भरतपुरच्या किल्लयांत, या वेळी, किती फौज होती, हे जरी नक्की समजत नाही, तरी किल्लयांतील जाट लोकांची अशी समजूत होती की, भरतपूर दुर्ग केवळ अजिंक्य आहे. जोपर्यंत, लांब नाकाचा घड्याळ मासा येऊन भरतपूरच्या खंदकांतील पाणी शोषण करूं लागला नाही तोपर्यंत, शत्रूकडून किल्ला जिंकला जाण्याची मुळीच भीति नाहीं !' या विधानावर जाट लोकांचा पूर्ण विश्वास होता, ह्मणूनच त्यांनी इंग्रजी सैन्याची पर्वा केली नाही. इंग्रजी सेनापति लॉर्ड लेक हाही, भरतपूरचा किल्ला घेणे हे सामान्य काम नाही, हे पूर्ण समजून होता. तटाची भिंत जरी मातीची होती तरी फार मजबूद होती. शिवाय असला प्रचंड तट पाडावयास लागणाऱ्या मोठ्या तोफा इंग्रजांपाशीं नव्हत्या. तथापि, आपण विजयी होऊ, अशी लॉर्ड लेक याची खात्री होती; कारण की, त्यांच्या सैन्याने पुष्कळ लढाया मारून मोठी कीर्ति संपादन केली होती. प्रकरण चौथें. मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे इंग्रजी सेना भरतपुरानजीक येऊन थडकल्यावर, शहरांतील जाट लोकांनीही आपल्या सेनेची पूर्ण तयारी करून, शत्रूशी दोन हात करण्याची संधि केव्हां येते, याची ते वाट पाहात बसले. इकडे, इंग्रजी सेना