पान:भरतपुरचा वेढा.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होती:-इंग्रजांनी परशत्रूपासून भरतपूरचे संरक्षण करावे. भरतपुरच्या राज्यव्यवस्थेत, इंग्रजांनी आपण होऊन बिलकूल ढवळाढवळ करूं नये. भरतपुरचा राजा मराठ्यांस जो कर देत असे, तो त्याने अतःपर त्यांस देऊ नये. शिंद्याने भरतपुरकरांचा पराभव करून त्यांची जी ठिकाणे घेतली होती, त्यांतील बहुतेक ठिकाणे त्यांस परत मिळावी. ___ वरील तहानंतर जेव्हां भरतपूरच्या राजाने होळकरांस आश्रय दिला, तेव्हां त्यानें तह मोडिला असे समजून इंग्रजांनी आपले लष्कर भरतपुरावर पाठविले. इ. स. १८०४, ता. २८ डिसेंबर रोजी, हे इंग्रजी सैन्य, डीग कडून भरतपुराकडे येत असतां, वाटेंत मेजर जनरल डौडेसवेल हा त्यास येऊन मिळाला. इ. स. १८०५, ता. १ जानेवारी रोजी, इंग्रजी सैन्य कुंभीर येथे जाऊन पोहोंचलें, व दुसऱ्या दिवशी, भरतपूरच्या दक्षिण व पश्चिम वेशीच्या बाहेर त्याने तळ दिला. तेथे इंग्रजी सेनापतीने आपल्या लष्कराची मुख्य छावणी केली व जनरल मेटलेंड यास भरतपुरच्या किल्ल्यावर मारा करण्याचा हुकूम केला. मेटलेंड साहेबानें छावणीपासून बऱ्याच अंतरावर असलेला एक बगीचा हस्तगत केला, व तेथें, ता० ४ जानेवारी रोजी, खंदक खणून, दुसऱ्या दिवशी रात्रौ, किल्लयावर तोफांचा भडिमार करण्याकरितां दोन मातीचे मोर्चे उभे केले. या मोहिमेंतील इंग्रजी सैन्याचा अधिपति थॉर्नसाहेब याने जो इतिहास लिहिला आहे, त्यांत त्यानें, भरतपूरच्या किल्ल्यांत, या वेळी, ८०,००० सैन्य होते असे लिहिले आहे. या लिहिण्यांत, शत्रूचे सैन्य फार मोठे होते व त्यामुळेच इंग्रजांचा पराभव झाला, असें ध्वनित करण्याचा, थॉर्नसाहेबांचा उद्देश होता किंवा नाही, हे सांगता येत नाही; तथापि इंग्रज इतिहसा