पान:भरतपुरचा वेढा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठ्यांचा जय खात्रीने झाला असता, असें पुष्कळ इतिहासकारांचे मत आहे. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा मोड झाल्यावर, देशांत, जिकडे तिकडे मोठी गडबड उडून गेली. त्या वेळी, ज्यांच्या अंगांत थोडेसें शौर्य होते त्यांनी आपलें व आपल्या परिवाराचे चांगलेच कल्याण करून घेतले; मग सूर्यमलासारख्या प्रतापी व चतुर पुरुषाने आपल्या शौर्याचा उपयोग अशा वेळी करून घेतला तर त्यांत काय आश्चर्य आहे ? त्याने कोणाशीही युद्धाचा प्रसंग न येऊ देतां आग्र्याचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. या वेळी, जाट लोकांच्या शौर्याची फार प्रख्याति झाली, व राजा सूर्यमल आतां आपल्या इतक्या दिवसांच्या कर्तबगारीने प्राप्त झालेल्या राजवैभवाचा सुखाने उपभोग घेणार तोच, दिल्लीपतीचा सेनापति नजीब उद्दौला याशी त्याची लढाई होऊन तींत तो मरण पावला! प्रकरण तिसरें. राजा सूर्यमलाच्या प्रमुखत्वाखाली, जाट लोकांच्या भरतपुरच्या राज्याचा विस्तार बराच झाला होता. यमुनानदीच्या उत्तरेस दिल्लीपर्यंत व दक्षिणेस ग्वालेरपर्यंत हे राज्य पसरलें. १६० मैल लांब व ५० मैल रुंद, एवढा प्रदेश या वेळी जाटांच्या ताव्यांत आला, परंतु सूर्यमलाच्या मरणानंतर, कर्त्या पुरुषाच्या अभावामुळे, जाटांच्या वैभवास उतरती कळा लागली. सन १७७४ त, दिल्लीच्या बादशाहाचा सेनापति नजफखान यानें, सूर्यमलाचा तिसरा मुलगा नवलसिंह याजकडून, आग्र्याचा किल्ला व दुसरी कित्येक स्थळे हिरावून घेतली. त्यानंतर लवकरच भरतपुरच्या राजवंशांत