पान:भरतपुरचा वेढा.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कलह उत्पन्न होऊन, आपआपसांत लढाया होऊ लागल्या, व हिंदुस्थानांतील या राजघराण्यांतील लोकांच्या ज्या महत्वाकांक्षेमुळे या देशास ही दुःस्थिति प्राप्त झालेली आहे, त्याच महत्वाकांक्षेमुळे भरतपुरचे प्रबळ राज्य प्रस्तुतच्या दुर्बलतेस पात्र झालें! सूर्यमलाचा नातू रणजितसिंह हा भरतपुरच्या गादीवर असतानां, इ० स० १८०५ मध्ये तो किल्ला घेण्याकरितां इंग्लिश सैन्याचा सेनापति लार्डलेक ह्याने तीन महिनेपर्यंत वेढा घातला होता, आणि त्या किल्ल्यावर चार वेळां हल्ला केला होता. पण ह्या चारीवेळां त्याचा पूर्ण पराभव झाला. तरी शेवटी वीस लाख रुपये स्वारी खर्चाबदल त्यास देऊन त्याने इंग्लिशांशी तह केला. यापूर्वी किंवा या नंतर, इंग्रजांनी दुसऱ्या अनेक किल्लयांस वेढे दिले, परंतु अशा प्रकारची माघार त्यांस कोठेही सोसावी लागली नाही. ही गोष्ट, प्रसिद्ध आंग्लइतिहासकार मिल्ल मेलिसन साहेब यांनीही स्पष्टपणे कबूल केली आहे. ___ भरतपूरचे युद्ध येवढे महत्वाचे असता, त्यासंबंधाने ह्मणण्यासारखी माहिती उपलब्ध नसावी, हे आश्चर्य होय. या युद्धांतील इंग्रजी योद्धा लॉर्ड लेक व दुय्यम योद्धा थान साहेब, या दोघांनी मात्र या लढाईची साद्यंत हकिकत लिहून ठेविलेली आहे व आमांस आज सर्वस्वी तिच्यावरच विश्वास ठेवून, निर्वाह करून घेणे भाग आहे. या परकीय लेखकांनी, स्वपक्षाचे गुणानुवाद गाण्यांत जितकें औदार्य दाखविलें आहे, तितकें आपल्या विरुद्ध पक्षाच्या पराक्रमवर्णनांत दाखविलेले नाही. शत्रूच्या शौर्याची साग्र व यथास्थित हकि