पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ८० ]

पतीस सुचविलें कीं " भेटाया त्या दीन बंधुला द्वारावतिला जावें । गाता ध्यातां परि सखयातें नेत्रं अवलोकावें || भजकाला आत्माही देतो ऐसा उदार तो कीं | दोनजनांचा कल्पवृक्ष ही कीर्ति तयाची लोकीं ॥......देइल कांहीं दयाळु तो प्रभु रक्षाया हीं बाळें । तुम्हाला स्वसख्याचें दर्शन घडेल बहुतां काळें ॥ हें स्त्रीचें ‘ प्रियहित ’ भाषण ऐकून सुदाम्यास संतोष वाटला व तो जाण्यास निघाला. पण " रिक्त पाणिने न विलोकावा गुरु ऐशी स्मृतिवाणी " म्हणून भार्येनीं—हाय ! ——' भिक्षा मागुनि ' आगलेल्या पोह्यांचीच फाटक्या चिंध्यांत बापड्यानें पुरचुंडी बांधली व तो आनंदानें श्रीहरीच्या दर्शनास निघाला |
 ईश्वरचिंतनांत गढलेला सुदामा लवकरच द्वारकेस येऊन पोंचला तोंच " अमरावतीसमाना द्वारावती परी कनकाची " पाहून तो थक्कच झाला. "एकापरीस एक सुरम्ये यादवगृह अपारें" व स्वर्गसुखासही मागे सारणारी व सत्यवतीस-इंद्रपुरीस - ही लाजविणारी तेथील शोभा व आनंद पाहून सुदाम्यास- दारिद्र्योपहत सुदाम्यास काय वाटले असेल याची वाचकांनीच कलना करावी. श्रीकृष्णाच्या सोळाहजार एकशे-आठ बायकांचे ते उत्तुंग प्रासाद ! " त्यांतुनि एका गृहांगणीं तो गेला ब्राह्मण दीन " त्यावेळेस प्रभू " श्रीरुक्मिणिच्या पलंगीं तेव्हां होता जगन्निवास । तेथें कळलें कीं भेटाया आलासे निजदास ॥ " तें कळल्याबरोबर त्या दयालु माधवाच्या हृदयांत मागील सर्व प्रसंग आठवून त्याची जी लगबग उडाली व धांवत जाऊन सुदाम्यास कडकडून मिठी मारून त्यानें जे प्रेमाश्रू ढाळले व सुदाम्याचे आदरातिथ्य केलें त्याचें नितांतरम्य व सहृदय वर्णन आपण पंताच्याच तोंडून ऐकूंयाः-“ झडकरि उठला दयाळु माधव वस्त्रादिक नावरितां । धांवत आला पुढे रमेला सांडुनि दासाकरितां ॥ ये यें बंधो ऐसें सद्गद बोलत धांवत आला । कडकडुनी भुज-युग्में स्वसख हृदयीं धरिता झाला ॥ मित्रांगस्पर्शानें झाला सुखी दयेचा सिंधू । लोचनपद्मापासुनि गळती प्रेमाश्रूंचे बिंदू ॥ धरुनि स्वसखा कर्री हरीनें पर्यकीं बैसविला ।” काय है अलौकिक मित्रप्रेम ! वाचक | गरीब द्रोणाचार्यास भर दरबारांतून हाकून देणारा. द्रुपद आपणास आठवतो काय ? " ते चित्र पहा व हे चित्र पहा " एवढेच आमचें आपणांस सांगणे आहे ! अस्तु.
 पण एवढयानेंच काय झाले आहे. पुढील आदरातिथ्य तर पहा:- " नल घाली रुक्मिणी पदावारे मणिकनकाच्या पात्रे । प्रक्षालन केले श्रीनाथें सुख-रोमांचित गात्रे ॥” अहाहा, पंत म्हणातात “ ज्याचे चरणापासून निघालेल्या गंगेर्ने शंकराच्या मस्तकावर