पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७९ ]

मधुर फायद्यां " चा ते योग्य उपयोग करून उलट “ बरें झाले देवा ! निघालें दिवाळें " असा ईश्वरास धन्यवादच देत असतात. देव भक्तालागी करु नेदी संसार " हेच खरें !
 तथापि बारा वाजण्याची वेळ मोठी कठिण असते. " भूक लागली असतां मोठा शंकराचार्य सुद्धां भाकरीचा तुकडा चोरील " अशी एक सर्वियन लोकांची म्हण आहे, त्यांत अगदींच तथ्य नाहीं असें नाहीं. " बुभुक्षितः किं न करोति पापं । क्षीणा नरा निष्करुणा भवंति अर्से म्हटलें आहें तें खरें आहे. पण ह्या सर्व गोष्टी प्राकृत जनांस लागूं आहेत. त्यांतील सार इतकेंच कीं, मोठा ब्रह्मज्ञानी झाला तरी त्याला क्षुधेची व्यथाहि जाणवतेच. देह आहे तोवर देहधर्माची जाणीव होणारच. पण त्या काम तितिक्षेचा अंगीकार करून, आत्मस्वरूप ओळखून रास्त मार्गाने जाणे हे साधूच करूं जाणे. तथापि भुकेची वेळ मोठी कठिण ही हि गोष्ट तितकीच खरी आहे. सुदामदेव जरी ब्रह्मनिष्ठ असला व सदा आत्मानंदीं मग्न असला तरी त्याची भार्या व मुलेबाळें ह्यांची तितकीच कशी स्थिति असणार? तुकाराम व त्यांचें कुटुंब यांत असाच फरक नव्हता काय ? पण जिजाईपेक्षां सुदाम्याची बायको जास्त शांत मर्यादशील व भिडस्त होती. परंतु अठरा विश्वे दारिद्र्याच्या कहारापुढे त्या साध्वीचा कुठवर टिकाव लागावा ? त्या विप्राची भार्या आर्या मलिना कृशा कुचैला " अशी ऐनबारा वाजतां पोटापाण्याच्या चिंतेने व्याकुळ झाली असतां एकदां नारद-ऋषी येऊन तिला मारे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगू लागले. " क्षुधातृषादी प्राणधर्म हे बाधिति कवणाला " इत्यादि त्यांचें व्याख्यान ऐकून "ब्रह्मज्ञान नको तुझें मुनि बरा येई न कामास ते । द्यावें अन्न शिशूंस अल्प तरि हो पायांस मी लागतें " अर्से त्या प्रेमळ मातेनें उत्तर दिलें. यावरून हीच गोष्ट सिद्ध होतें. नुसत्या ब्रह्म-ज्ञानाच्या कोरड्या गप्पानी पोटांत भडकलेली क्षुधेची आग कशी शांत होणार ? अस्तु.
 तेव्हां एकदां ‘‘ ते एकदां पतीच्या पाशी बहु भीत भीत गेली | अवाड्मुखीं-कंपिततनु साध्वी कर जोडुनिया ठेली " मनांत हेतु हा कीं एकदां पतीला कृष्णाकडे पाठवून कांही पोटास मिळाले तर पहावें. पण कृष्णपरमात्मा स्वतः पतीचा मित्र असून ते स्वतः जर त्याच्याकडे अद्याप गेले नाहींत तर आपण कसें त्यांस तसें सांगावें ही भीतिहि आंतून वाटत होतीच. पण त्याच बरोबर संसाराच्या विविध तापानें गांजलेल्या त्या साध्वीचा कंठहि दुःखानें सद्गदित झाला होता. अशा भय-गद्गद स्थितींत निरुपाय होऊन मोठ्या कष्टानें पण अत्यंत लीनतेनें तिनें शेवटीं आपल्या