पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[५]

विषयींचें त्याचें ब्रीद व त्याचें उदार, उदात्त व शुद्ध चारित्र्य यांस त्याच्या उत्तर चरित्रांतच विशेष अवसर मिळाला आहे. पुत्र, मित्र, बंधु व पति या नात्यानें कृष्णानें केलेल्या लीलांनींच प्रस्तुतच्या त्याच्या पूर्वचरित्रास अपूर्व माधुर्य आले आहे. यांतील सर्व प्रसंग व वर्णनें लेखकानें निरतिशय भक्तिप्रवण अंतःकरणानें लिहिली आहेत. या दृष्टीनें या लेखाला ' कृष्णलीलामृत ' ह नांव अन्वर्थक झालें असतें. लेखकाची भाषाशैली एकंदरीत मोहक आहे. लेखकाच्या भक्तिप्रेमरंगांशीं त्याच्या बहुश्रुततेचा संगम झाल्यामुळे चरित्रास विचित्रता आली आहे. अवतरणें व प्रतीकें यांनीं मात्र या लेखांत गर्दी करून आपलें वर्चस्व स्थापण्याचा शिकस्तीचा प्रयत्न केला आहे; तसेंच एकेक शब्दाला दोन दोन तीन तीन पर्याय - शब्द देण्याची लेखकाची अनावर प्रवृत्ति रसिक वाचकांस उद्वेग उत्पन्न करील असें वाटतें. तथापि हे दोष लेखकाला सहज टाळतां येण्यासारखे आहेत. शुक-परीक्षितांसारख्यांमध्ये देखील रासक्रीडेसंबंधानें शंकासमाधानाचे प्रसंग आलेले आहेत; मग आजच्या कित्येक चिकित्सक रसिकांच्या अंतःकरणांत ती रासक्रीडा क्रीडा किंवा पीडा उत्पन्न करीत असल्यास त्यासंबंधानें खेद किंवा आश्चर्य वाटण्याचें कारण नाहीं. श्रीकृष्णाचें ह गद्यात्मक अल्प पूर्वचरित्र भक्तिमान् वाचकांस प्रिय होईल असे वाटतें. यापेक्षां मोठ्या सायंत कृष्णचरित्राची भूक वाचकांस असल्यास रा. ब. चिंतामणराव वैद्य यांचे विस्तृत व्यापक व सर्वांगपरामर्षी श्रीकृष्णचरित्र त्यांनीं वाचावें.

ता. २२-१-२३. प्रो० लक्ष्मणशास्त्री लेले.

 भगवान् श्रीकृष्ण, अथवा श्रीकृष्णाचें नितान्तरम्यचरित्र, या पुस्तकांतील बराचसा भाग मी वाचून पाहिला. त्यावरून पाहतां हैं पुस्तक फार चांगलें झालें आहे, असें म्हणण्यस हरकत नाहीं. श्रीकृष्णाचें चरित्र आधी मूळचेंच रम्य आहे. पण त्यांतही रा. साने यांनी आपल्या प्रेमळ वाणीने