पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग पांचवा

 पण वाचक ! रुक्मिणीच्या रम्य विवाहकथानकाकडे वळण्यापूर्वी ज्या “ गोकुळ- वासी जनांचा " प्रभूला व आपणांस कधींच विसर पडणार नाहीं त्यांच्या स्थितीचें- कृष्णाच्या पश्चात् त्याच्या विरहाने झालेल्या त्यांच्या दुखःद स्थितीचें करुणचित्र प्रभूनीं धाडलेल्या उद्धवाबरोबर जाऊन आपणांस क्षणभर पहावयास नको काय? चला तर वाचक, आपण क्षणभर त्याच करुणसुखद दृश्यांत रंगूं या. त्या " गोकुळ- वासी जनां ” चें प्रेम आपल्या ठिकाणीं कसें अपरिमित होते व त्यामुळे त्यांची कशी शोकजनक अवस्था झाली असेल याचें वर्णन प्रभु मध्वमुनींच्या तोंडून “ उद्धवा शांत- वन कर जा” ह्या अत्यंत करुणरसपूर्ण पद्यांत करतातः- “उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळवासी जनांचें ।। बाळा उद्धवा ! माझ्यावांचून ढळढळा रडत असणाऱ्या त्या गोकुळवासी जनांचें जाऊन तूं कसेंबसें सांत्वन कर बरें ! उद्धवा ! अरे काय सांगूं तुला ? "बा नंद यशोदा माता भजसाठी त्यजतिल प्राण ! | त्यागून प्रपंचा फिरती मनि उदास रानोरान ||" माझ्या वियोगदुःखानें रानीवनीं भटकणारा माझा नंद बाप व यशोदा माता हीं जीवसुद्धां देतील बरें! उद्धवा ! माझ्या वियोगाने तळमळणारे माझे मायवाप- हाय ! त्यांची स्थिति आतां कशी असेल ? " अन्नपाणि त्यजिलें रडती अति दुःखित झाले दोन " उद्धवा ! माझ्या जन्मापासून त्यांनी किती कष्ट सोसले व किती खस्ता खाल्या वरं ! “जन्मलो तैहुनी झटले | मजलागीं तिळतिळ तुटले | कटि- खांदि वाहता घटले । आटले रक्त देहाचें ॥ १ ॥ " अरेरे ! उद्धवा ! ही स्थिति केवळ माझ्या मातापितरांचीच होती काय ? नाहीं बरें. " आइबाप त्यजूनी बाळें मज संगे खेळत होतीं | गोडशा शिदोन्या आणुनी आवडिने मजला देती । रात्रंदिस फिरले मार्गे दधिगोरस चोरूं येती । " अहाहा ! आईबापांचा त्याग करून माझ्या प्रेमानें भुललेल्या त्या बाळांना टाकून मला इकडे यावें लागले ना ! अरेरे ! उद्धवा ! ही गोष्ट माझ्या जिवास कशी लागून राहिली आहेरे हायहाय ! माझ्यावांचून आतां त्यांचें कर्से होत असेल? मी कोठें क्षणैक दृष्टीआड झालों की " कृष्णा ! कृष्णा ! म्हणून टाहो फोडणारीं तीं बालकें आतां आपले दिवस कसे कंठीत असतील - कुणा - च्या तोंडाकडे पहात असतील? " मी तोडुनि आलों तटका । तो जिवासि लागला