पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ७१ ]

चटका । मजविण त्या युगसम घटिका आठवतें प्रेम जयाचें ॥ २ ॥ " उद्धवा ! त्यांचें तें अलोट प्रेम आठवलें म्हणजे अजूनही मला कसें भडभडून येतें ! तसेच त्या गोपींचीहि हीच स्थिति बरें ! अहाहा ! माझ्या मुरलीच्या संगीतानें गुंगलेल्या गोपीनीं " बांसरी बजाव सखे बांसरी बजावोरे !" " बजाव बजाव मुरली । कन्या बजाव बजाव मुरली । " अशी माझी कितीदां तरी प्रार्थना करावी. माझ्या दिव्य लावण्याचें पान करता करता त्या गोपींची तंद्री लागावी व माझ्या प्रेमानें रंगलेल्या त्या गोपींनीं माझ्या मुरलीच्या तालावर नाचत मी म्हणेन तेव्हा माझ्याभोंवर्ती गोळा व्हावे ! उद्धवा ! प्रेमळ गोपींना भग्नमनोरथ करून मी इकडे आलों ना ? हायरे देवा! त्या निष्कपट हृदयाच्या सरल वाला एव्हांनी मरून सुद्धा गेल्या असतील - माझ्या वियोगाच्या झुरणीनें झुरून झुरून त्यांचा केव्हांच अंतही झाला असेल. यासाठी उद्धवा ! तूं एकदां लवकर जाच; व गेल्याबरोबर " हरि आहे सुखरूप म्हणुनी भेटताचि त्यां सांगावें । सांगीं समस्तां पुशिलें प्रत्युत्तर त्या मागावें " उद्धवा ! त्या सर्वांच्या चिंतेनें माझी इकडे कशी तळमळ होत आहे-माझा जीव कसा कासावीस होत आहे व त्यांच्या आठवणीच्या दुःखानें माझी अवस्था कशी कावरीबावरी झाली आहे हे त्यांना नीट सांग बरें! वास्तविक उद्धवा ! “ हें कार्य नव्हे तुजजोगें । मजसाठीं जावें वेगें । ” निरुपाय आहे, उद्धवा, तूं जाच लवकर जा व तुझ्याकडून होईल तितका बोध करून त्यांच्या शोकाला बांध घाल. "
 मध्वमुनींचें वरील हृदयस्पर्शी पद्य वाचून कोणाचें बरें चित्त हेलावणार नाहीं ? कोणाच्या हृदयाची कालवाकालव होणार नाही ? उद्धवाची स्वारी गोकुळास जाऊन पोचल्याबरोबर त्यास काय दिसून आलें ? 'करिता दळणकांडण । माझें दीर्घस्वरें गाती गुण | कीं आदरिल्या दधिमंथन | माझें चरित्र गायन त्या करिती ॥ करिता सडासम्मार्जन । गोपिकांसि माझें ध्यान । माझेनि स्मरणें जाण । वरिये देणें बाळका || .. विसरत्या त्या विषय सुखें | विसरल्या त्या द्वंद्वदुःखें | विसरल्या त्या तहान- भूके । माझेनि एर्के निदिध्यासें " श्रीकृष्णाचें ध्यान श्रीकृष्णाचें मनन व श्रीकृष्णाचेंच सदा चिंतन यांवांचून अवघ्या गोकुळास दुसरा विषय ठावा नव्हता! " की मजचि नाम जिणिया ठेविलें ” अशी त्यांची स्थिति होती ! हानलानें वाळलेले गोपगोपींचे व व्रजबालांचे देह केवळ प्रभुचिंतनावर त्या नामामृतावर जगले होते. किंबहुना पांडवा | आपलिया सर्व भावा । जियावया वोलावा | मीचि केला " अशी त्यांची अवस्था होती. वृक्षपाषाणांतून सुद्धां त्याच प्रभूचें दिव्य नाम निघत