पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

[ ६९ ]

शोभणाऱ्या आमच्या राण्यास अद्याप ' राणी' मिळाली नव्हती. त्याचा तो उत्तुंग प्रासाद अद्याप गृहिणीवांचून सुनाच होता. वसुदेवास कृष्णानें सुना मिळवून दिल्या-शिवाय तो प्रासादही सुनाच रहावा हे योग्यच आहे. पण "भोगा: के रमणीं विना ? " किंवा " गृहं तु गृहिणीहीनं कांतारादतिरिच्यते " ह्या प्रसिद्ध वचनांप्रमाणे ह्या सर्व वैभवावर गृहस्थाश्रमाचा लखलखीत कळस चढविल्यावांचून-रमणीचा सौभाग्य- कुंकुमतिलक त्यास लाविल्यावांचून त्यास मार्दव, सौंदर्य व पूर्णता येणार नव्हती. श्रीकृष्णानीं त्या मार्दवाची व सौंदर्याची प्राप्ति कशी करून घेतली हे जाणण्यास आमचे प्रिय वाचक आतां साहजीकच उतावळे झाले असतील, तर त्यांना आतां रुक्मिणीच्या रम्य विवाहकथेकडेच घेऊन जाऊं म्हणजे झालें.