पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६० ] " " "" त्यानंतर कृष्णप्रभु जाण र म्हणून गोकुळांत केवढा हलकल्लोळ उडाला याचें वर्णन वर आलेंच आहे. त्या प्रसंगी " नंद यशोदा बोलत । मथुरेसि नेता श्रीकृष्णनाथ । तेचि क्षणीं आमुचा प्रांणांत । होईल जाण अक्रूरा । ही कृष्णप्रभूच्या मातापि त्यांची स्थिति, किंवा अक्रूरा देखता घेऊनियां माती । गोषी आपुल्या मुखीं घालिती । म्हणती मनमोहन यदुपती । भेटसी आतां कधीं तूं ? " ही गोपिकांची शोचनीय अवस्था- किंबहुना सर्व गोकुळाचा तो चित्त हेलावणारा विलाप ऐकून नाथ म्हणतात तसें खरोखरच “व्यथें पाषाण उतरी " मग अक्रुगसारख्या सहृदय मनुष्याला भडभडून यावें है किती साहजीक आहे. श्रीधर म्हणतात " ऐसे देखोनि त्या अवसरां । अष्टभाव नावरती अकुरा । नयनीं चालिल्या अश्रुधारा । प्रेम देखोनि गोपिकांचें ! किती है सहृदय वर्णन ! असो. परंतु शेवटी श्रीकृष्णास मेलें हैं पाहिजेव-- राजाज्ञा व एका दृष्टीनें ईश्वराज्ञाच --अनुलंघनीय आहे -हें पाहून त्यानें नंदयशोदेचें " तुमचे दृष्टीस हा 'बाळ' दिसत । परी कृतां- तासी शिक्षा करीत ” । व गोपगोपीचें अक्रूर बोले न लागतां क्षण | कंसासि मारील श्रीकृष्ण । अशा रितीने कसेबसें समाधान करून तो कृष्णबळीरामांस घेऊन निघाला. श्रीकृष्णानींही " येईन लौकरी म्हणून त्या सर्वोचें समाधान केले; पण कांहीं केलें तरी गोपिकांसारख्या अव्याज व उत्कटप्रेमी व्रजांगनांचा शोक कमी होणें अशक्यच होतें. तेव्हां रथ घडघडा समिरगती " न्च नेणें भाग होतें व त्याप्रमाणें तो त्यानीं नेलाही. कारण कृष्णप्रभु गोपींच्या अव्याज प्रेमांत किर्ताही गुंगले तरी त्यांत स्वकर्तव्याची विस्मृति होणारे ते तुम्हां आम्हांसारखे मानव नव्हते. आणि ज्या प्रेमाच्या गुंगीत कर्तव्याची - अत्रतारकार्याची विस्मृति होते ते प्रेम नसून ती अफूची गुंगी आहे असेंच म्हटले पाहिजे ! खरें सात्त्रिक प्रेम कर्तव्याच्या आढ न येतो त्यास | उलट उत्तेजनच देत असतें. आकाशींच्या चंद्राकडे व त्याच्या प्रेमी तारकांकडे पहा! तारकांच्या छबकड्या नाचांत दंग झालेल्या सुधांशूला आपल्या कर्तव्याची कधीं विस्मृति पडली आहे काय ? तारकांच्या सात्विक प्रेमाचें अमृतपान करून अमृत- निधि सुत्रांशु अधिकच उल्लासाने आपले कर्तव्य करीत असतो. त्या तारकांसही लाजविणा-या गोपींच्या रासक्रीडेत दंग झालेला आमचा कृष्णही सुधांशूपेक्षाही कांकणभर जास्तच कर्तव्यरत होता. आपल्या विलापाने पाषाणासही पाझर फोड- णाऱ्या गोपींना, कर्तव्याची वेळ आल्याबरोबर क्षणार्थीत बाजूस सारून त्यांच्या प्रेमाचा पाश तटकन् तोडून - प्रभु निघाले. यावरून प्रसंगी "वज्रादपि --