पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ ६१ ] " कठोराणि " अशी " लोकोत्तर.णां चेतांसि " कशी बनत असतात हे चांगलेच दिसून येतें. असो. या प्रमाण श्री कृष्णप्रभूची स्वारी आपले मुख्य अवतारकार्य करण्यासाठी निघाली. वाटेनें जातांना अक्रुराच्या मनांतील धाकधुकीचा शेवटचा धागाही तोडून टाकण्या- करितां प्रभूनीं एक कौतुक केलें! कृष्णबळरामास रथावर ठेवून अक्रूर यमुनेवर स्नानास गेला व तींत बुडी मारली तो पाण्यांतही त्याला कृष्णबराम दिसले ! आश्चर्यचकित होऊन अक्रूर पुन्हां रथाकडे पाहतो तो ते रथावर बसलेले ! आपणास भ्रम तर झाला नाहींना, म्हणून त्याने पुन्हां पाण्यांत बुडी मारली तो पुन्हां ते दोघे पाण्यांत ! कृष्णप्रभूच्या ह्या लीला म्हणजे त्यांच्या हातचा नुसता मळ होता. अक्रुराची मात्र तो चमत्कार पाहून ईश्वराच्या सर्वव्यापीपणाबद्दल खात्री पटली व सर्व भीति लयास जाऊन तो आनंदानें पुन्हां रथावर येऊन बसला. "सोडोनीयां घोडीं चालला तांतडी । दिली असे बुडी जळःमध्यें || दावोनी कौतुक निरसी त्याचा धाक ह्या नामदेवांच्या ओळीत ह्याच चमत्काराचा उल्लेख आहे. असो. " 66 66 ह्याप्रमाणें चमत्कार दाखवून अक्रुरास निर्धास्त करून कृष्णप्रभूची ती श्यामसुंदर मूर्ति आपल्या तेजाची प्रभा फांकीत मथुरेस येऊन ठेपली. कृष्णबलराम रथाखाली उतरले व एका बाहेरच्या बागेत उतरून यमुनेवर स्नान करून बरोबर आणलेल्या भाकऱ्या खाऊन दोघेही मथुरानगरी पाहण्यास बाहेर पडले. एका रंगा-याकडून वस्त्रें, माळ्याकडून हार, व कुब्जा दार्साकडून गंध मिळवून त्यांहीं करून आपली काया वस्त्र, माल्य व गंध यांनी सजवून प्रभूची स्वारी शस्त्राग राकडे वळली. कृष्णप्र- भूची ती सुनील अंगकांति - गगनोदराशी स्पर्धा करणारी ती सुनील प्रभा-पाहून कोण सत्वस्थ जीव वेडावून जाणार नाहीं ? पाहोनीया मुख झाले समाधिस्थ | ऋषि मुनि समस्त वेडावले. " असा तो प्रभु प्रेक्षागारांत जाऊन ज्या धनुष्याचा यज्ञ करावयाचा होता ते कसे काय आहे म्हणून पाहण्यास घेऊन त्यानीं तें सहज वांक- विल्याबरोबर काडकन् मोडून पडलें- अथवा पाडलें म्हणा. त्याबरोबर शस्त्रागाराचे रक्षक आश्चर्यचकित व कांहींसे भयभीत होऊन ती बातमी सांगण्यास कंसाकडे धांवले. तो इकडे याप्रमाणें पराक्रम गाजवून प्रभु बारा वाजण्याचे - मध्यान्हीचे सुमा- रास प्रेक्षागाराकडे वळले व रंगद्वाराशी येऊन ठेपले. तोच पूर्वी योजून ठेवल्याप्रमाणें 'कुवलयापीड ' नावाचा हत्ती त्याच्या माहुतानें प्रभूंवर घातला. अशा रितीने कृष्णास दाराशींच ठार मारण्याचा त्या ' कृष्ण ' हृदयी कंसाचा बेत होता. त्या वेळचा तो (