पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[५९ ] " 6" कबीर ! " असें कबीरांनी उगीच कां म्हटले आहे ? " कृष्ण कृष्ण इति पल्लव डोलती " असा त्या प्रभूच्या दिव्य मोहनाचा प्रतापच होता. "उद्धवा ! " देव पुढे सांगतात- माझ्यासमोर प्रेमोल्लासानें नाचलेले मोर, गोपिकांशीं लपंडाव खेळलेल्या त्या गुल्मलता, किंबहुना मी ज्या गवतावरून चाले तें गवतसुद्धां माझ्या संगतीनें उद्धरून गेलें बरें ! पण उद्धवा ! अशा प्रेमळ गे कुळास-नाथमुखानें हार म्हणतात:-- " ऐसि. यासि म्यां अतिनिचाडता | कृतघ्नाचे परी सांडून जातां | माझ्या वियोगकाळींची कथा । व्यथें पाहतां पाषाण उतटी ! अस्तु. । "" 66 66 श्रीकृष्णप्रभूस मारण्यास काय युक्ति करावी ह्या विचाराने वेडा झालेल्या कंसास त्याच्या कपटपटु मंत्र्यांनी सल्ला दिली की " प्रधान म्हणती धनुर्याग | आरंभावा सवेग | बळराम आणि श्रीरंग | आदरें करूनि अणावें || " आणि मग नम्र वचन बोलून त्यांतें । शेवटीं घात करावा. त्याप्रमाणें कंसानीं अक्रुरास सत्वस्थ, सज्जन व ईश्वरभक्त अशा अक्रुरास त्यांना आणायला धाडलें. त्या वेळेस अक्रुरास प्रथम वाईट वाटलें -- " मनीं चिंता वाटे थोर । कंस चांडाळ दुराचार | बळराम आणि यदुवीर | दोघे सुकुमार कैसे आणूं ? पण मागून श्रीकृष्णाचें अद्भुत चरित्र आठवल्यावर मात्र " म्हणे आजि धन्य नयन | देखेन वैकुंठीचें निधान । पूर्ण ब्रह्म सनातन | मी पाहेन डोळेभरी!” नंतर अक्रुराची स्वारी दिव्यरथ घेऊन झपाट्यानें निघाली. गोकु- ळाच्या वनाजवळ अक्रूर आला तोच “ देखिला त्रिभुवननाथ डोळां । जीमूतवर्ण घनसांवळा | रुळती आपाद वनमाळा । गोरजें डौरला वदनचंद्र ॥ उदार श्रीमुख आकर्ण नयन । कुंडलासभोंवतीं किरण | हरितनूचा आश्रय पूर्ण | अलंकार घवघ- वीत।” या श्रीधरांच्या सुंदर वर्णनानें सजलेल्या प्रभूच्या ध्यानांत कोणचा भक्त मन होणार नाही ? नामदेव त्याच स्थितीचें अधिक काव्यमय वर्णन करतात - " तनू है आकाश चंद्रमा तें मुख । ऐसें निष्कलंक परीक्षिती ॥ १ ॥ पूर्णिमेचा चंद्र त्याहूनी अधिक । शोभत श्रीमुख कृष्णजीचें ॥ २ ॥ भोंवता हा शोभे नक्षत्रांचा मेळा । खेळत सांवळा जगद्गुरु ॥ ३ ॥ तें सुंदर कृष्ण मुख पहून अश्रुराची तृप्तीच होईना ! “ जोडोनिया हात घाली नमस्कार | वाहातसे नीर क्षणक्षण! " ते पाहून " नामा म्हणे त्वरें धांवे ह्रषीकेशी । धरित पोटाशीं अक्रूरतें । " सुनील तनूच्या आकाशोद- रात शोभणारा तो वदनचंद्र व त्याभोंवर्ती कृष्णसख्यांचीं तीं नक्षत्रे यांचा आनंद पाहून अक्रुराच्या नेत्रांत सात्विक अश्रु उभे राहिले हें साहजीकच आहे. असो. 66 । खेळणारी